
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मुंबईत 165 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) 52 जागांवर आपले उमेदवार देईल. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.
या जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये मनसेने सुरुवातीला 60 ते 65 जागांची मागणी केली होती, ज्यात 40 ते 45 ‘ए प्लस’ जागांचा समावेश होता. परंतु, त्यांना 52 जागांवर समाधान मानावे लागले. यापैकी 8 ते 10 जागा ‘ए प्लस’ प्रवर्गातील असल्याचे म्हटले जाते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 25 जागांची मागणी केली होती, नंतर त्यांना 16 जागांचा प्रस्ताव देण्यात आला, पण अखेर 10 जागांवर सहमती दर्शवण्यात आली आहे. या संपूर्ण जागावाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे.
Leave a Reply