• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Multibagger Stock :पाच वर्षांत एकदम सैराट; 7100 टक्क्यांनी हा शेअर धावला, आता दिग्गजांची गुंतवणुकीसाठी धावाधाव

April 11, 2026 by admin Leave a Comment


Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी अद्वैत एनर्जीने कमाल केली आहे. गेल्या पाच वर्षात या कंपनीने शेअरधारकांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्सने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे.

गेल्या पाच वर्षात अद्वैत एनर्जी ट्रान्झॅक्शन या कंपनीने 7100 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 3 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 1865.25 रुपयांवर बंद झाला. दोन दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया आणि आशिष कचोलिया यांनी या कंपनीवर मोठा डाव लावला आहे.

या कंपनीचा शेअर गेल्या पाच वर्षात 7143 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 5 एप्रिल 2021 रोजी 25.75 रुपयांवर होता. तर 10 एप्रिल 2026 रोजी हा शेअर 1865.25 रुपयांवर पोहचला. मागील तीन वर्षांचा आलेख पाहता या शेअरमध्ये 468 टक्क्यांची उसळी आली आहे.

अद्वैत एनर्जीचे मार्केट कॅप शुक्रवारी 2040 कोटी रुपयांच्या घरात पोहचले. दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्याकडे या कंपनीचे 1,25,000 शेअर आहे. कंपनीत त्यांचा वाटा 1.14 टक्के आहे. तर आशिष कचोलिया यांच्याकडे 2,25,000 शेअर आहेत. कचोलिया यांची कंपनीत 2.06 टक्के वा

कंपनीने आता गुजरातच्या वीज कंपनीसोबत करार केला आहे. ही वार्ता समोर आल्यावर या शेअरमध्ये 3 टक्क्यांची उसळी दिसून आली. तर हा शेअर लंबी रेस का घोडा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात त्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात काकडीचे सेवन म्हणजे आरोग्यासाठी वरदान, ‘या’ 4 पदार्थांसोबत खाल्ल्यास मिळेल दुप्पट फायदा
  • Gold Rate : आता सोनं खरेदी करणं अशक्य! 10 ग्रॅमचा भाव तब्बल….किंमत पाहून थक्क व्हाल!
  • आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणारा अभिनेता, लुकमुळे शाळेत सहन करायचा टोमणे
  • IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?
  • Photo : असीम मुनीरसोबत असणारी महिला कोण? संपूर्ण जगात का होतेय चर्चा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in