• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Multibagger Stock: गुंतवणूकदारांचा भांगडा, 1 लाखांचे झाले 78 लाख, ज्वेलरी कंपनीच्या शेअरची तुफान घोडदौड

February 6, 2026 by admin Leave a Comment


ज्वेलरी कंपनी थंगमायिल ज्वेलरच्या शेअरने शुक्रवारी मोठी कमाल केली. थंगमायिल ज्वेलर्सचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आता 3491.80 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत मोठा परतावा दिला. ट्रेडर्सच नाही तर गुंतवणूकदार मालामाल झाले.

कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षात छप्परफाड परतावा दिला. थंगमायिल ज्वेलरी शेअरने गेल्या 10 वर्षांत 1 लाखांच्या गुंतवणुकीवर तुफान परतावा दिला. या काळात गुंतवणूकदारांना 78 लाख रुपयांहून अधिकचा परतावा दिला आहे. ज्वेलरी कंपनीच्या शेअरने या काळात मोठी कमाल केली.

कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर 4138.15 वर जाऊन पोहचला होता. तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी 1526.45 रुपये इतका निच्चांकी भाव होता. तेव्हापासून हा शेअर 120 टक्क्यांहून अधिकने वधारला. कंपनीचा शेअर 6 फेब्रुवारी 2026 रोजी 3491.80 रुपयांवर बंद झाला होता.

गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, थंगमायिल ज्वेलर्सचा शेअर 80 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. गेल्या पाच महिन्यात थंगमायिल ज्वेलर्स शेअर 1075 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. कंपनीच्या प्रमोटर्सकडे 61.56 टक्के वाटा आहे. तर उर्वरित हिस्सा हा सार्वजनिक आहे.

थंगमायिल ज्वेलरने गेल्या 10 वर्षांत मोठा परतावा दिला. 12 फेब्रुवारी 2016 रोजी या कंपनीचा शेअर 89.37 रुपयांवर होता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यादिवशी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्याकडे 1118 शेअर असते. या कंपनीने 2023 मध्ये बोनस शेअर दिला. त्यामुळे शेअरची संख्या वाढून 2236 इतकी झाली असती. त्या हिशोबाने 1 लाखांचे 78 लाख रुपये परतावा मिळाला असता.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजीपाला की सोने-चांदी? महागाईत वाढ कशामुळे? RBI ने सांगितले कारण
  • Rinku Singh: क्रिकेटर रिंकु सिंह याला लाखोंचा गंडा? फेसबूक अकाऊंट हॅक; ईमेल आयडीच नाही तर बँकेचा तपशीलही बदलला, अपडेट काय?
  • ‘त्या’ आयलँडवर रंगायचा सेक्सचा बाजार, माजी पंतप्रधानांपासून…., कसं आहे ते आयलँड?
  • ‘घुसखोर पंडत’ सीरिजवरून तापलं राजकीय वातावरण; मायावतींची थेट केंद्राकडे ही मागणी
  • पाकिस्तान मोठ्या संकटात, आणीबाणी लागू, सरकारची मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in