• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mohan Bhagwat: Gen Z संघाच्या शाखेत? प्लॅन काय? मोहन भागवतांचं थेट उत्तर, कोणता पाहिला इंग्रजी चित्रपट?

March 19, 2026 by admin Leave a Comment


RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता 100 व्या वर्षात दाखल झाला आहे. संघाने या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेतले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे रुपडे बदलत असले तरी कार्यपद्धत तीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी संघाबद्दलच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली. त्यांनी सोशल मीडिया आणि जेन झी पिढीविषयी सुद्धा मोठे भाष्य केले. ही नवीन दमाची आयुधं संघ आत्मसात करणारच आहे. पण संघ अनेक बदलासही सजग झाला आहे.

प्रश्न – फेसबुक इन्स्टाग्राम सारखे समाज माध्यम आज आहे. त्यावर मोकळेपणाने लोक व्यक्त होतात. त्याकडे दुर्लक्ष ही करता येत नाही. काही लोक अत्यंत कट्टर विचाराने त्यावर व्यक्त होतात आणि सर्वांना वाटते की हे संघाचे लोक आहेत असा भ्रम निर्माण होतो. अशा नवीन समाज माध्यमाबद्दल स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे असा वाटते का?

गरज आहे आणि ते केले ही जात आहे मीडिया इन्फ्ल्यूव्हेन्सर्स आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोबत प्रचार विभाग काम करत आहे. स्वयंसेवकाने सोशल मीडियावर वावरताना विवेक ठेवला पाहिजे एखादी गोष्ट सांगायची शैली योग्य असायला हवी. अनुशासन असायला हवं. एखादा स्वयंसेवक सोशल मीडियावर वेळ वाकड काही मांडतो. मात्र मला सर संग चालक केले आहे मी एखाद्या व्यासपीठावरून जो बोलतो ते अधिकृत आहे. मात्र स्वयंसेवकांना सोशल मीडियावर कसं वावरायचं त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रश्न – Gen Z या पिढीबद्दल काय वाटते? ते संघ कार्याशी जुळत आहेत का? शाखेत येत आहे का?

शाखेमध्ये आम्ही त्यांना जसं संपर्क करू शकतो ते करतो. मात्र ते शाखेमध्ये सतत यायला हवे अशी काही व्यवस्था संघ करत आहे. हायराईज बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये कसं तरुणांशी संपर्क साधावा हे आम्ही करत आहोत. संघाशी जोडलेल्या Gen g ची संख्या वाढली पाहिजे, यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. त्यांच्या वैचारिक प्रवाहामध्ये संघाबद्दल बरीच अनुकूलता आहे असा आमचा अनुभव आहे.

प्रश्न – अनुकूलतेच्या काळामध्ये स्वंयसेवकानी कसे वागावे, प्रसिद्धी अभिमुख व्हावे.

अनुकूलता सह आव्हानही असतात. संघ स्वयंसेवक प्रसिद्धी साठी काम करणारा होऊ नये अशी अपेक्षा आहे आणि त्या साठी आम्ही काम करत आहोत. सध्या अनुकूलता आहे, साधन वाढली आहे, खूप आहे असं नाही मात्र पोटापुरते आहे. अनुकूलतेची बाधा होऊ नये त्यासाठी जी वॅक्सिंग दिली पाहिजे त्याची व्यवस्था आम्ही करू.

प्रश्न – विचारधारेतून संस्कार

सुरुवातीचा काळ वेगळा होता आव्हाने वेगळी होती त्यामुळे आमचे कार्य तसे होते. आता काळ बदलला आहे आव्हान बदलली आहे त्यामुळे आमचे कार्यही बदलत आहे. आमची विरोधक (कम्युनिस्ट) संघाचे आम्ही विरोधक आहोत असे म्हणतात. मात्र संघ चांगला आहे असेही ते म्हणतात. आणि हे आता मोठ्या प्रमाणावर होत आहे.

प्रश्न – नरेटिव्ह सेटिंग बद्दल

विश्व संवाद केंद्र नावाची एक व्यवस्था आमची आहे. ते विविध गोष्टीबद्दल माहिती गोळा करत असतात. तथ्यात्मक माहिती ते समोर आणत असतात.

प्रश्न – तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव असलेली व्यक्ती कोण?

कठीण प्रश्न आहे. भाग्याने अनेकांचे मार्गदर्शन लाभले. मात्र, गुरुजींचा नाव घेतलं पाहिजे त्यांचा अनेक वर्षांचा मार्गदर्शन लाभला. संघाची ओळख त्यांच्या मार्गदर्शनातूनच झाली. जर एक व्यक्ती म्हणत असाल तर गुरुजींचा प्रभाव सर्वाधिक राहिला.

प्रश्न – झेड प्लस सिक्युरिटी मुळे कोणती कामे करता येत नाही? झेड प्लस सिक्युरिटी काढून तुम्हाला तुमची वेस्पा गाडी पुन्हा दिली, तर तुम्ही कोणती काम करणार.

जर तशी मोकळीक मिळाली तर सर्वांना भेटायला जाईल. वर्धा जिल्ह्यात पुलगावला जाऊन चिवडा खाता येत होता तसा खाता येत नाही. अशी मोकळीक मिळाली तर सर्वांना जाऊन भेटेल. आता मिरचीची भाजी मिळत नाही. शिळ्या पोळीचे कुटके ही मिळत नाही.

प्रश्न – वाचनाला वेळ मिळतो का? कोणत्या पुस्तकांचा तुमच्यावर प्रभाव आहे?

आता वाचायला नव्हे तर चाळायला वेळ मिळतो, एक सलग पुस्तक उचलून वाचलं एवढा वेळ सध्या मिळत नाही. इस्रायलच्या माजी पंतप्रधानाने लिहिलेला एक पुस्तक आहे. निश्चयाने एखादी गोष्ट करायची असेल तर ती समाजाच्या मदतीने करता येते असं अनुभवाचा तो पुस्तक आहे. माझ्यावर परिणाम करून केलेला तो पुस्तक आहे. सुभाष चंद्र बोस यांच्यावरील काही पुस्तक आहेत. दत्तोपंत ठेंगडी यांच्या संसदीय कार्याबद्दलचे पुस्तक आहे, यांचा माझ्यावर प्रभाव आहे.

प्रश्न – इंग्रजी चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड होती आता वेळ मिळतो का?

शेवटचा चांगला इंग्रजी चित्रपट “लॉर्ड ऑफ द रिंग्स” पाहिला त्यालाही दहा वर्षे झाली.

प्रश्न – राजकारण्यांच्या यशाकडे सर्व समाज कौतुकाने पाहत असतो. ते तरुणांचे आयकॉन असतात. तरुणांनी राजकारणात गेलं पाहिजे की समाजकारणात गेलं पाहिजे.

तरुणांनी कुठेही गेले तरी समाजकारण केलं पाहिजे. नितीन गडकरी या ठिकाणी बसले आहे ते राजकारणी असले तरी समाजाचे काम ते जास्त करतात. जे काही आपण करतो त्यात समाजाचा विचार करून आपण करायला हवं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in