• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mohan Bhagwat: लोकसंख्या,धर्मांतर आणि घुसखोरांबाबत मोहन भागवत यांचं मोठं विधान; प्रत्येक मुद्द्यावर थेट भाष्य…

February 9, 2026 by admin Leave a Comment


RSS Chief Mohan Bhagwat Big Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. सरत्या वर्षापासून संघाकडून विविध कार्यक्रम सुरू आहे. सध्या मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी सरसंघाचलक मोहन भागवत यांनी मन मोकळं केलं. या ठिकाणी मोहन भागवत यांनी संघ विचार मांडले. लोकसंख्या, धर्मांतर आणि घुसखोरांबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एक मुल धोरणामुळे घटली लोकसंख्या

यावेळी मोहन भागवत यांनी पंचकोनी कुटुंबाची बाजू मांडली. मला हा प्रश्न विचारला नाही पाहिजे. गृहस्थांनी विचार केला पाहिजे. मला काही माहीत नाही. पण लोकांना भेटतो त्यामुळे साांगतो. डॉक्टर म्हणतात, १९ ते २५ वर्षात लग्न आणि तीन आपत्य. त्यामुळे मुलं आणि आईवडील हेल्दी राहतात. सायकोलॉजिस्ट म्हणतात तीन संतान असतील तर ते इगो मॅनेजमेंट शिकतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात विच्छेद होत नाही. कुटुंबाचं आरोग्य चांगलं असतं. पॉप्युलेशन सायंटिस्ट म्हणतात तीनच्या खाली धोका आणि २.१ च्या खाली म्हणजे तुम्ही रसाताळाला जात आहात. आता आपण २.१ च्या खाली जात आहोत. बिहारच्या कारणामुळे आपण वाचलो. थोडे वर आहोत. बऱ्याच देशाने हा प्रयत्न करून २.१ च्या खाली जाऊन आता तीनच्यावर आपली लोकसंख्या आणली. आणि देशाची पॉप्युलेशन पॉलिसी म्हणते २.१. गणितात २.१ असते. पण माणसात असं नसतं. माणूस ३ असतो. पण दोन कुटुंबाचा प्रश्न आहे. पती पत्नीचाही प्रश्न आहे. समाजाचाही आहे. त्याचा विचार केला पाहिजे.

पालनपोषण कसं करणार हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. तर्कसंगत नाही. थोडा फार त्रास होऊ शकतो. एक कादंबरी आहे. सत्य आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञाचं आत्मचरित्र आहे. कॉलेजमध्ये प्रेम झालं आणि त्याने लग्न केलं. त्याने ठरवलं १२ मुल जन्माला घालायची. त्याने स्लीपर बाय डझन नावाचं पुस्तक काढलं. त्यावर सिनेमा निघाला. तो पाहा. त्यामुळे पालनपोषणाची समस्या दूर होईल, असं सरसंघचालक म्हणाले.

विवाह केला तर जबाबदारी घ्यावी लागेल

विवाह करायचा नाही. संन्यास घ्यायचा असेल, संघात काम करतायचं असेल तर ठिक आहे. विवाह म्हणजे दोघांच्या शारीरिक संबंधाची गोष्ट नाही. विवाह म्हणजे समाजाचं जे युनिट आहे फॅमिली, त्याला उत्पन्न करणारं उपकरण आहे. आणि संस्कार आहे. विवाह करायचा आणि जबाबदारी पाळायची नाही असं होता कामा नये. विवाह केला पाहिजे. दोघांनी जबाबदारी पाळली पाहिजे. गृहस्थाश्रम निभावलं पाहिजे, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

धर्मांतरावर काय म्हणाले सरसंघचालक?

असंतुलनाचे दोन कारणं आहे. बर्थ रेट हे तिसरे आहे. पहिलं आहे, कनर्व्हजन. आपल्याकडे मत स्वातंत्र्य आहे. तुमचा देव तुम्ही निवडू शकता. तुम्ही निवडला तर त्यावर कुणी बोलणार नाही. रेवरंड नारायण वामन टिळक होते. कोकणस्थ ब्राह्मण होते. त्यांना येशूचा मार्ग आवडला. ते ईसाई झाले. त्यांच्या पत्नीला नाही आवडला. तर त्या हिंदू राहिल्या. त्यांचे पुत्रही हिंदूच होते. कुटुंबात विच्छेद झाला नाही. कुटुंब होते. जेव्हा ते चर्चमध्ये तुकारामांचे अभंग गायला लागले तेव्हा त्यांना चर्चच्या बाहेर काढले. पण ते ईसाई होते. रेव्हरंड नारायण टिळक मोठे कवी होते
पण जोर जबरदस्ती, लालच देऊन, मजबुरीत फसवून आपली झुंड वाढवण्यासाठी आपल्या झूंडमध्ये लोकांना खेचणं हे धर्मांतर त्याज्य आणि निषेधार्ह आहे. त्याला घर वापसी हे उत्तर आहे. ते बंद होऊन झालं पाहिजे. जे येणार आहेत, त्यांना रस्ता तयार होतो. जबरदस्ती होत नाही. त्यामुळे असं मतांतरे बंद झाली पाहिजे. जे गेले त्यांना परत आणलं पाहिजे, असा विचार सरसंघचालकांनी मांडले.

घुसखोरीबाबत मोठे मंथन

घुसखोरीबाबत सरकारने खूप काही केलं पाहिजे. डिटेक्ट आणि डिपोर्ट केलं पाहिजे. सेन्सेक्स आणि एसआयआर होत आहे. आम्ही एक गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे डिटेक्शन. जे लोक येतात त्यांच्या भाषणातून दिसतं. योग्य अधिकारी आणि पोलिसांना सांगा. तुम्ही चौकशी करा. कोणत्याही विदेशीला रोजगार द्यायचा नाही. मुसलमान असला तरी रोजगार देऊ. पण विदेशींना देऊ नये. त्यामुळे डोळे उघडून पाहा. छोटे काम करणारेही हे लोक दिसत आहे. हिंदू समाजात अनेकांनी छोटी कामं सोडली आहेत. सर्व मोठ्या कामाच्या मागे लागले आहेत. त्यामुळे जिथे कोणी नसतं तिथे या विदेशी लोकांचा रोजगार पक्का होता. कुणाचा रोजगार मारायचा नाही. पण सर्व प्रकारच्या कामात आपले लोक असावेत. हिंदू नाहीत, पण या देशातील आहेत त्यांना काम दिलं पाहिजे. आपण ते करू शकतो, असे मोहन भागवत म्हणाले.

अर्थव्यवस्थेत नवाचार आणावा. आपली लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे रोजगाराचे प्रयत्न केले पाहिजे. रोजगार मारायचे नाही. एआय सारखी टेक्निक येत आहे. त्याचा उपयोग रोजगाराला धक्का न लागता आपलं चाललं पाहिजे असं केलं पाहिजे. मास प्रोडक्शन आहे. पण आपला जोर प्रोडक्शन बाय मासेसवर असं पाहिजे. हजारो जागी एक प्रकारचं उत्पादन झालं तर स्वस्त होईल. तेव्हा भाव नाही तर क्वॉलिटिची स्पर्धा होईल. जे तंत्रज्ञान येईल त्याचा लोकांना रोजगारासाठी फायदा झाला पाहिजे. तुमच्याकडे दोन लाख आहे तर तुमची किंमत आहे. काय करता त्या पैश्याचं. तुम्ही दोन तांदूळ गहू खरेदी कराल. दोन लाखाचे तांदूळ घेतले तर त्याची प्रतिष्ठा नाही. शेतकरी शेती करतो. त्याचा मुलगा तयार आहे. तो आधुनिक तंत्राने शेती करतो. पण त्याला मुलगी मिळत नाही. त्यात सुधारणा केली पाहिजे. मेंटल स्थिती बदलली पाहिजे. आपल्याकडे रोजगार वाढले पाहिजे. खाली हाताला रोजगार मिळाला पाहिजे. नोकरीच्या पाठी सर्व फिरत आहेत, असं होता कामा नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’, मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
  • Salman Khan At RSS Program : संघाच्या मंचावर सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी! विरोधकांकडून टीकेची झोड
  • दिग्दर्शकाने दिल्या आई-बहिणीवरून शिव्या, नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून..
  • उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुन्हा सभागृहात जाणार? मविआची रणनीती
  • Love Story : मजबूत शरीराचा पण कमजोर मनाचा, गर्लफ्रेंडने लग्नाची साडी दाखवताच..एक बॉडी बिल्डरची अधुरी प्रेम कहाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in