
मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांडुपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) पहिला बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. वॉर्ड क्रमांक ११४ मधून माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी मनसेकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुंबई महापालिकेतील मनसेची ही पहिली बंडखोरी असल्याचे बोलले जात आहे. अनिशा माजगावकर यांनी पक्षाच्या नेतृत्वाने चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु शिवसेनेने युतीमध्ये चांगल्या जागा स्वतःकडे घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे मनसेला निवडून येणाऱ्या जागा मिळाल्या नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. माजगावकर यांनी आपल्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा आणि विभागातील जनतेचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, जनतेला त्यांच्यासारखी कार्यक्षम नगरसेविका पुन्हा हवी आहे. मनसेच्या उमेदवारांना उमेदवारी नाकारल्याने अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत असताना, भांडुपमधील हा प्रकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
Leave a Reply