
Hardik Pandya on Vaibhav Sooryavanshi : IPL 2026 मध्ये सलामीचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली होती. पण काल त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पावसामुळे 11 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिली बॅटिंग केली. राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावून 150 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमला 11 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 123 धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सने हा सामना 27 धावांनी जिंकला. या मॅचनंतर सर्वाधिक चर्चा होतेय ती वैभव सूर्यवंशीची. या युवा खेळाडूची चर्चा झालीच पाहिजे. कारण त्याने कामगिरीच तशी केलीय. 14 चेंडूत 39 धावा फटकावताना त्याने टीमला धमाकेदार सुरुवात करुन दिली. त्याच्या खेळीत 1 फोर आणि 5 सिक्स आहेत.
वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने देखील त्याला शुभेच्छा दिल्या. कारण वैभव सूर्यवंशीने मुंबई इंडियन्सच्या सगळ्या प्लानची वाट लावून टाकली. वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी खास प्लानिंग करण्यात आलेली. पण त्याने पहिल्या बॉलपासून मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याला सुद्धा बोलावं लागलं, कमाल खेळला मुलगा.
फक्त कौतुक नाही वस्तूस्थिती सांगितली
15 वर्षाच्या वैभवची बिनधास्त फलंदाजी पाहून हार्दिक पंड्या सुद्धा हैराण झाला. आक्रमकपणे तो मुंबईच्या गोलंदाजांवर तुटून पडला. हार्दिकला हे कळतच नव्हतं की त्याला कसं रोखायचं? कोणाच्या हाती चेंडू सोपवायचा?. वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी एक स्पेशल मीटिंग झाली होती. त्यात जी आखणी करण्यात आलेली. ते सर्व प्लान एक-एक करुन फेल झाले. वैभव मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत होता. म्हणूनच मॅच संपल्यानंतर हार्दिक पंड्याने फक्त वैभव सूर्यवंशीच कौतुकच केलं नाही, तर जी वस्तूस्थिती होती ती सुद्धा सांगितली.
ते लाजवाब आहे
“कमाल मुलगा आहे. 15-16 वर्षाच्या मुलाचा असा गेम पाहून हैराण व्हायला होतं” असं हार्दिक म्हणाला. वैभवसाठी केलेल्या स्पेशल मीटिंगबद्दलही हार्दिकने जाहीरपणे सांगितलं. “मुंबई इंडियन्स जेव्हा या मॅचसाठी रणनिती बनवत होती, त्यावेळी सूर्यवंशीवर विशेष लक्ष देण्यात आलेलं. पण ज्या पद्धतीची त्याने बिनधास्त बॅटिंग केली, ते लाजवाब आहे” असं हार्दिक बोलला. त्याने वैभवला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
वैभव सूर्यवंशीने यशस्वी जैस्वाल सोबत पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला 11 ओव्हर्समध्ये 150 धावांचा डोंगर उभारता आला.
Leave a Reply