
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधला सर्वोत्तम संघ समजला जातो. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. पण मागच्या तीन-चार सीजनपासून या टीमचं गणित चुकतय असं वाटतं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ही सर्व जेतेपद मिळवली. पण त्याची जादू संपल्यानंतर मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने थेट हार्दिक पंड्याला टीमचं कॅप्टन बनवलं. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सला डेब्यूमध्येच आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर सलग दुसऱ्या सीजनमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सची टीम फायनलमध्ये पोहोचली. त्यामुळे मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने थेट गुजरात बरोबर ट्रेड करुन हार्दिकला टीममध्ये आणलं. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला गतवैभव मिळवून देईल असा मालकांना विश्वास वाटला होता. पण हार्दिकच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत घसरण झाली आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 मध्ये सलामीचा सामना जिंकून चांगली सुरुवात केली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध तब्बल 220 धावांचा डोंगर पार केला होता. तब्बल 13 वर्षानंतर मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात विजय मिळाला. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा विजय खास होता. मुंबईच्या चाहत्यांना वाटलं की हा सीजन वेगळा असेल. सुरुवात चांगली झालीय. त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम या सीजनमध्ये कमाल करेल. पण दुसऱ्याच सामन्यापासून मुंबई इंडियन्सची कामगिरी ढासळत चालली आहे. मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावून पराभवाची हॅटट्रिक केली आहे. दिल्ली कॅपिटल्स, त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.
हे मुंबई इंडियन्सचे हुकूमी एक्के मानले जातात
मुंबईच्या खेळात टीम परफॉर्मन्सच दिसत नाहीय. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर काही तरी चुकतय असच टीमचा खेळ पाहून वाटतो. बॉलिंगमध्ये तर ज्यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या तेच निराश करतायत. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सचे हुकूमी एक्के. प्रतिस्पर्धी टीमच्या धावगतीला लगाम घालून विकेट काढणं ही याची खासियत. पण या दोघांची गोलंदाजी पाहिल्यानंतर ते हीच गोष्ट विसरले की काय असं वाटतय. ट्रेट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह ना प्रतिस्पर्धी टीमच्या धावा रोखत आहेत, ना विकेट काढत आहेत. त्यामुळे समोरची टीम सहज 200 प्लस धावा करत आहे.
दोघांचा मागच्या चार सामन्यातील परफॉर्मन्स कसा आहे?
केकेआर विरुद्ध पहिल्या सामन्यात ट्रेट बोल्टने 4 ओव्हरमध्ये 38 धावा दिल्या पण एकही विकेट काढला नाही. बुमराहने 4 ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या पण शून्य विकेट. दुसऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात बुमराहने 4 ओव्हरमध्ये 21 धावा दिल्या. पण शून्य विकेट. तिसऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात बुमराहने 4 ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या. पण विकेट मिळाला नाही. बोल्टने तर या मॅचमध्ये 1 ओव्हरमध्ये 22 रन्स लुटवल्या. कालच्या RCB विरुद्ध सामन्यात बोल्टने 4 ओव्हरमध्ये 50 रन्स देऊन एक विकेट काढली. तेच बुमराहने 4 ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या. पण एकही विकेट नाही.
एबी डिविलियर्सने जे म्हटलं ते आता खरं होतय
यंदाचा आयपीएल सीजन सुरु होण्याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने ट्रेंट बोल्ट बद्दल शंका व्यक्त केली होती. ती आता खरी होताना दिसत आहे. “न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आता तितका भेदक वाटत नाही, जशी तो आधी गोलंदाजी करायचा. याचा मुंबई इंडियन्सला फटका बसू शकतो” असं एबी डिविलियर्सने म्हटलं होतं. आता बोल्टचा परफॉर्मन्स सुद्धा तसाच आहे.
Leave a Reply