• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs RCB : इलाका तुम्हारा धमाका हमारा, विराटची ऐतिहासिक कामगिरी, मुंबई विरुद्ध महारेकॉर्ड

April 12, 2026 by admin Leave a Comment


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामिगिरी केली आहे. विराटने वानखेडेत फिल सॉल्ट याच्यासह झंझावाती सुरुवात करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Photo Credit : BCCI/IPL)

Rcb Virat Kohli

मुंबईने टॉस जिंकल्यानंतर आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विराट आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. या दरम्यान विराट आणि फिल सॉल्ट या दोघांनी चौफेर फटकेबाजी करुन मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. (Photo Credit : BCCI/IPL)

Rcb Virat Kohli Most Runs Against Mumbai Indians

विराटने मुंबई विरुद्ध 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली. विराटने या दरम्यान 20 धावा पूर्ण करताच ऐतिहासिक कामगिरी केली. विराटने 20 वी धाव घेताच महारेकॉर्ड ब्रेक केला. विराट मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक आणि वेगवान 1 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने यासह केएल राहुल याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : BCCI/IPL)

Philip Salt and Virat Kohli

विराट कोहली याच्याआधी मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम हा केएल राहुल याच्या नावावर होता. केएल राहुल याने मुंबई विरुद्ध 2014 ते 2026 दरम्यान 21 सामन्यांत 977 धावा केल्या आहेत. (Photo Credit : BCCI/IPL)

KL Rahul IPL 2026

दरम्यान विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. विराट आणि फिल या दोघांनी आरसीबीसाठी 10.5 ओव्हरमध्ये 120 रन्सची पार्टनरशीप केली. (Photo Credit : BCCI/IPL)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
  • GK : भारतात एका मिनिटाला किती बालके जन्मतात? हैराण करणारा आकडा
  • शत्रू तुमच्या पायाशी घेईल लोळण, चाणक्य नीतीचे 3 गुप्त नियम एकदा वाचा, मग कधीच होणार नाही पराभव!
  • IPL 2026, MI vs RCB : रोहित शर्माची मुंबईसाठी मोठी खेळी, पण सामना मधेच सोडावा लागला; कारण..
  • शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 3 बड्या नेत्यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश, धक्का कुणाला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in