• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद

March 30, 2026 by admin Leave a Comment

MI vs KKR : IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला हरवलं. IPL मधील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने हा विजय मिळवला. या मॅच दरम्यान अशी एक घटना घडली, त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या वादाचा संबंध मॅचमधील टॉसशी आहे. त्यावर क्रिकेट फॅन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका क्रिकेट चाहत्याने विचारलं की, हे असं मुंबई इंडियन्सच्या सामन्यातच कसं होतं?. मॅचच्या आधी रहाणेने जे पाहिलं, त्यामुळे तो सुद्धा हैराण दिसला.

पण प्रश्न हा आहे की, झालं काय? ज्यावरुन मुंबई विरुद्ध केकेआर सामन्यात इतका वाद झाला?. हा सगळा विषय टॉसशी संबंधित आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने हवेत टॉस उडवला. रहाणे छापा-काटा काय ते बोलला. पण नाणं जमिनीवर पडल्यानंतर कॅमेऱ्यावर हेड की टेल आलं हे नाही दाखवलं. सरळ मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला हे जाहीर केलं. क्रिकेट फॅन्सना ही गोष्ट पचनी पडत नाहीय. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Why this always happens when MI is playing any match? like Wtf, camera hi ghuma diya, toss dikhaya hi nahi 🤨#MIvsKKR pic.twitter.com/XeMWsC9eCM

— 100 NOT OUT (@100NotOutVK) March 29, 2026

MI vs KKR मॅचच्या टॉसच्यावेळी जे घडलं, त्याला कोणी टॉस फिक्सिंग ठरवलं. एकाने विचारलं हे असं मुंबई इंडियन्सच्या सामन्यातच का होतं? एकाने जाणूनबुजून शिक्का हरवला असाही आरोप केला.

Hardik Pandya flicks the coins and camera moved away and didn’t show whether it was head or tail and Mumbai Indians won the toss.😂pic.twitter.com/Gg9qFHBsrZ

— कट्टर KKR समर्थक 🦁🇮🇳 ™ (@KKRWeRule) March 29, 2026

अजिंक्य रहाणेला कसलं आश्चर्य वाटलं?

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. KKR चा कॅप्टन अजिंक्य रहाणे सुद्धा बोलला की, त्यांना पहिली गोलंदाजी करायची होती. वानखेडेच्या पीचवर अजिंक्य रहाणेने आश्चर्य व्यक्त केलं. “याआधी मी कधी वानखेडेच्या पीचवर इतकं गवत बघितलेलं नाही. ज्या प्रॅक्टिस पीचवर मी खेळलोय ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते”

When MI vs KKR toss happened, Ajinkya Rahane called tails ,but right when the result was about to be shown, the camera flipped and we couldn’t see it 👀

Its toss fixing and somehow Mumbai Indians winning the toss .
https://t.co/YpoApJIH0A

— ` (@Atomickolly17) March 29, 2026

कोलकाता टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 220 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने 20 व्या ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य पार केलं. मुंबईने 6 विकेट आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. मागचे 13 सीजन मुंबई इंडियन्सचा सतत पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा
  • कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
  • Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in