• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mahayuti | मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ ; शरद पवार गटाचा एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांमध्ये

February 6, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिकेच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेत आता रावराणे यांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे बळ अधिक मजबूत झाले आहे. मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ पासून निवडून आलेले रावराणे यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि विविध मुद्यांवर चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी महायुती गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पालिकेतील शरद पवार गटाचा एकमेव आवाज आता सत्ताधाऱ्यांच्या गटात मिसळणार आहे. अजित रावराणे म्हणाले की, प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यात अडचणी होत्या. तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुतीकडून सहकार्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले. त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील राजकीय संतुलन बदलण्याची शक्यता वाढली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जग हादरलं! 2026 बाबतची बाबा वेंगाची ती भविष्यवाणी खरी ठरली? सोन्या-चांदी वाढत्या दरामुळे आता….
  • लहान मुलांसाठी कच्चं दूध धोकादायक; होईल गंभीर आजार
  • घर खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी! आरबीआयचा मोठा निर्णय, रिअल इस्टेट क्षेत्रात…
  • T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरबद्दल मोठं सत्य सांगितलं, सगळ्यांना जे वाटतं ते…
  • Narendra Modi | नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in