
महाराष्ट्रात इतके दिवस पावसामुळे नागरिक चिंतेत होते, आता पावसाचं संकट टळलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यातील नागरिकांना उष्णतेचा तडाखा सहन करावा लागू शकतो. राज्यभरात उन्हाळ्याला सुरूवात झाली असून उन्हाचा कडाका वाढल्याचं पहायलं मिळत आहे. कोकण तसेच विदर्भात उष्णतेची लाट आली असून वाढत्या उन्हामुळे चटक सहन करावे लागत आहेत, घराबाहेर पडणंही मुश्किल झालं असून येता काही काळ तापमानाचा पारा वर चढलेलाच राहू शकतो, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सर्वतोपरी काळजी घेण्याचे, तसेच भर उन्हा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
नागरिकांना सहन करावा लागणार उन्हाचा चटका
दरम्यान, आज रविवार 12 एप्रिल रोजी राज्यातील हवामान उष्ण आणि कोरडे राहील. पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसून येत्या 3-4 दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होऊ शकते. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा ( यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत तापमान झपाट्याने वाढू शकतं, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे, भरदुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. समुद्रकिनारी भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या भागात किमान तापमान 24 ते 26 अंश तर कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं. उत्तर महाराष्ट्रात देखील कोरडे आणि उष्ण वातावरण कायम असेल. मात्र आज दिवसभर तापमान उच्च पातळीवर राहणार असल्याने, तेथील नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अशा वेळी योग्य कालजी घ्या पुरेस पाणी प्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात किमान तापमान 23 ते 25 अंश तर कमाल तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस राहू शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Leave a Reply