• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री पदासाठी हालचालींना वेग, राष्ट्रवादी आमदारांची तातडीची बैठक

January 30, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्ष ते विरोधकांपर्यंत सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत तातडीने बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा, नेतृत्वाची जबाबदारी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी भारतात आले ‘पाकिस्तानी’ खेळाडू, Video
  • RBI JOB : १० उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी, आरबीआय बँकेत भरतीची शेवटची तारीख जवळ आली
  • Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
  • Stock Market Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले
  • GK : जपानमध्ये विद्यार्थिनी मिनी स्कर्ट का परिधान करतात, लॉजिक वाचल्यावर चकित व्हाल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in