
गॅसअभावी अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होण्याची राज्यात वेळ आली आहे. अनेक शहरातील प्रसिद्ध हॉटेल्सने वेळेत बदल केला आहे. तर काहींनी थेट हॉटेल्स बंद ठेवल्या आहेत. काही जणांनी चूल पेटवली आहे. तर दुसरीकडे गॅससाठी ग्राहकांची कसरत अद्याप थांबलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून गॅस एजन्सीबाहेर सातत्याने लांबच लांब रांगा दिसून येत आहे. भर उन्हात ग्राहक गॅस सिलेंडर टाकी घेऊन एजन्सीबाहेर बुकिंगसाठी थांबलेले आहेत. तर सरकारने नैसर्गिक गॅस संकट लवकरच दूर होण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने 40 हून अधिक देशांकडून गॅस आयात करण्यास सुरूवात केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ईकेवायसी प्रक्रियेचा फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. काही बोगस लाभार्थी समोर आले आहे. तर जवळपास 60 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विदर्भात आज हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं कळेल
Leave a Reply