
सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. बीड मोक्क्यातील फरार आरोपी सनी उर्फ शनेश्वर आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीनवर पडू शकते. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. तर या पदासाठी 31 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया होणार होती. मात्र भाजप आणि शिंदेसेनेने अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Leave a Reply