
पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी महसूल सचिव विकास खारगे समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सादर केला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आलं आहे. तसंच या व्यवहारात मदत करणाऱ्या दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. पुण्यातील मुंढवा भागातील मोक्याची जमीन अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने स्वस्तात खरेदी केली होती. तर दुसरीकडे वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेऊन MMRDA ने डीबी एचआयएलएल एलबीजी या सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली. तसंच तातडीने सल्लागाराचे कंत्राट रद्द करण्यासह त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आलं. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply