• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG Price Increased : आम्ही काय चुलीवर स्वयंपाक करायचा का ? युद्धाच्या भडक्याने नागरिक गॅसवर

March 7, 2026 by admin Leave a Comment


इराणवर अमेरिका-इस्त्रायलने हल्ला चढवत युद्ध सुरू केलं. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झळा हळहूळ संपूर्ण जगाला बसत असून आता या युद्धाचे चटके भारतीयांनाही बसताना दिसणार आहेत. हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे गॅस तुटवड्याची शक्यता असून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली असून त्यामुळे देशातील नागरिकांना मातार मोठा फटका बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 115 रुपयांनी वाढणार आहे. आजपासूनच हे नवे दर लागू होणार आहेत. मात्र यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार असून हॉटेलिंग , बाहरेचं खाण-पिण हेही महागू शकतं.

आम्ही काय चुलीवर स्वयंपाक करायचा का ?

यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून सामान्य नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ आम्हाला परवडणारी नाही. सामान्य कुटुंबातील महिलांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र गॅस सिलेंडरच्या भावामध्ये वाढ झाली आहे यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे. आता आम्ही चुलीवरती स्वयंपाक करायचा का ? असा रोखठोक सवाल संतप्त महिलांना, गृहिणींनी विचारला आहे.

गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची बुकिंगसाठी धाव

दरम्यान अमेरिका–इराण–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियावरील मेसेजमुळे नागरिक घाबरले असून कल्याण–डोंबिवलीत नागरिकांनी बुकिंगसाठी धाव घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही, घरपोच गॅस पुरवठा नियमित सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

मात्र असं असलं तरीही तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन सिलेंडर घेण्यामधील कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवसांवर आला आहे. शासनाने नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या असून नियम लागू होती. पण या नव्या नियमांमुळे काही कुटुंबांना अडचण निर्माण झाली असून या नियमात सवलत द्यावी अशी गॅस सिलेंडर एजन्सीची मागणी आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन गॅस वितरण संघटनेने नागरिकांना केलं आहे.

नागपूरमध्ये गो गॅस पंपावर LPG भरण्यासाठी ॲाटोचालकांची गर्दी

नागपुरात गो गॅस पंपावर LPG भरण्यासाठी ॲाटोचालकांची गर्दी झाली होती. मर्यादीत पुरवठा होत असल्याने LPG साठी ॲाटोचालकांनी रांगा लावल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in