• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG booking rules: एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारकडून ग्राहकांना इशारा, eKYC अनिवार्य

April 10, 2026 by admin Leave a Comment


LPG booking rules: पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे देशभरात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. एलपीजीच्या पुरवठ्याबाबत दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आता सरकारने ग्राहकांना घाबरून खरेदी न करण्याचा आणि अनावश्यक एलपीजी बुकिंग न करण्याचा इशारा दिला आहे. एलपीजी सिलेंडरसाठी अनेक नागरिक थेट वितरकांकडे जाऊन रांगा लावताना दिसत आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना डिजिटल बुकिंग माध्यमांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून वितरण सुव्यवस्थित होईल आणि पुरवठ्यातील व्यत्यय टाळता येईल. यासाठी इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅससाठीच्या ऑनलाइन बुकिंगमधअये अलिकडच्या दिवसांत जवळपास 95 टक्के वाढ झाली आहे. त्यातही अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) अनिवार्य करण्यात आला आहे.

बुकिंगचा कालावधी

शहरी भागांमध्ये रिफिल बुकिंगचा कालावधी 25 दिवसांपर्यंत असून ग्रामीण भागांमध्ये तो 45 दिवसांपर्यंत आहे. त्याचबरोबर रिफायनरी उत्पादन वाढवण्यात आलं असून अत्यावश्यक क्षेत्रांसाठी पुरवठ्याला प्राधान्य दिलं जात आहे. ग्राहक मोबाइल ॲप्स, अधिकृत वेबसाइट्स, एसएमएस, आयव्हीआरएस, व्हॉट्सॲप आणि मिस्ड कॉल्स यांसारख्या अनेक डिजिटल माध्यमांद्वारे एलपीजी सिलिंडर बुकिंग करू शकतात. इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल ॲप्स, तसंच उमंग, पेटीएम आणि फोनपे यांसारखे प्लॅटफॉर्मसुद्धा सुलभ बुकिंग पर्याय देतात. यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष वितरकांकडे जाण्याची गरज नाही.

नवीन एलपीजी बुकिंग नियम

नवीन एलपीजी बुकिंग नियमानुसार (मार्च/एप्रिल 2026 पासून) रिफिलसाठी अनिवार्य प्रतीक्षा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. शहरी भागात 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. साठेबाजी रोखण्यासाठी हा कालावधी लागू करण्यात आला आहे. ग्राहकांना ई-केवायसी/ बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील पूर्ण करणं आवश्यक आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटल सेवांचा आणखी विस्तार करण्यात आला आहे. सध्या देशभरातील सुमारे 95 टक्के एलपीजी बुकिंग ऑनलाइन केलं जातं. याव्यतिरिक्त 91 टक्के डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड प्रणालीद्वारे केल्या जातात. यामुळे गॅसचा गैरवापर रोखण्यात मदत होते.

पाच किलोच्या एफटीएल एलपीजी सिलिंडरचीही मागणी वाढताना दिसत आहे. एका दिवसांत 90 हजारांहून अधिक पाच किलो सिलिंडरची विक्री होत आहे. हे सिलिंडर एलपीजी वितरकांकडून कोणत्याही पत्त्याचे पुरावे न देता फक्त ओळखपत्र दाखवून खरेदी करता येतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मान, कोपरे आणि काखेत काळपटपणा आहे? सावधान, लगेचच डॉक्टरांकडे जा, नाही तर थेट..
  • Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in