• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG ATM India: आनंदवार्ता, गॅस सिलेंडरसाठी संपली प्रतिक्षा, देशातील पहिल्या LPG एटीएमची सुरूवात, रिकामी टाकी आणा आणि… मिनिटात भरून न्या!

March 19, 2026 by admin Leave a Comment


LPG ATM India: मध्य-पूर्वेतील युद्धाचा थेट परिणाम इंधन आणि गॅस संकटाच्या रुपाने होत आहे. देशात पेट्रोल-डिझेल नाही तर गॅस टंचाई दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशातील अनेक नागरिक लांबच लांब रांगेत रोज उभे राहत आहेत. त्यांना एलपीजी सिलेंडर मिळण्याची अजूनही शाश्वती वाटत नाही. तर सरकारने तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. दरम्यान आता गॅस संकटावर अजून एक उपाय समोर आला आहे. नवी दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) एलपीजी एटीएमची सुरुवात केली आहे. हा एक पथदर्शी प्रकल्प असून लवकरच देशातील अनेक शहरात असे एलपीजी एटीएम सुरू होण्याची शक्यता आहे.

नियमातील बदलाने ग्राहक पॅनिक

देशात एलपीजी पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि गरजूंना गॅस मिळवा यासाठी सरकारने एलपीजी पुरवठ्याविषयीच्या नियमात मोठे बदल केले. बुकिंगविषयीचे नियम आणि कालावधी वाढवला. त्याचा उलटा परिणाम झाला. ग्राहकांनी थेट गॅस एजन्सीवर धडक दिली. गॅस पुरवठा होणार नसल्याचा संदेशच यातून गेला. नैसर्गिक गॅसची नवीन खेप गुजरात बंदरावर दाखल झाली आहे. तर सरकारी आणि खासगी कंपन्यांनी गॅस उत्पादन वाढवले आहे. तरीही परिस्थिती पूर्व पदावर येण्यासाठी कालावधी लागणार असल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. त्यामुळे ग्राहक अधिक पॅनिक झाले आहे. त्यांना रोजच्या जेवणाची चिंता लागली आहे. यावर सरकारने अजून उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गुरुग्राममध्ये पहिले एलपीजी एटीएम

सध्याच्या या परिस्थितीत बीपीसीएलने एक चांगला निर्णय घेतला आहे. गुरुग्राममधील सोहाना येथील सेक्टर -33 मध्ये एका रहिवासी भागात एलपीजी एटीएमची सुरुवात करण्यात आली आहे. हे ऑटोमॅटिक एलपीजी वेंडिंग सिस्टिम लोकांच्या मदतीला येणार आहे. रिकामे सिलेंडर आणून ग्राहकांना ते भरून घेता येईल. कंम्पोझिट सिलेंडर भरण्यासाठी जास्तीत जास्त तीन मिनिटांचा कालावधी लागेल. पाण्याच्या जारप्रमाणे लोकांना आता गॅस सिलेंडर भरून घेता येईल. त्यासाठी एलपीजी गॅस एजन्सीवर जाण्याची अथवा गॅस घरपोच येण्याची वाट पाहावी लागणार नाही. हे एलपीजी एटीएम सातही दिवस 24 तास सुरू असेल.

UPI, Credit-Debit Card चा वापर

गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी ग्राहकाला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल. तो एटीएम मशीनच्या की बोर्डवरून टाईप करून नोंदवावा लागेल. त्यानंतर एक क्युआर कोड येईल. तो UPI पेमेंटद्वारे स्कॅन करून पेमेंट करता येईल. Credit-Debit Card चा सुद्धा ग्राहकांना वापर करता येईल. पण या एलपीजी एटीएमवर लोखंडी गॅस टाकी नाही तर कंम्पोझिट सिलेंडरचा वापर करता येईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in