• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

LPG सिलेंडरवर किती टॅक्स भरावा लागतो? तो हटवल्यास 913 रुपयांचा सिलेंडर किती रुपयांनी होईल स्वस्त?

April 7, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा तणाव आता जगभरात पाहायला मिळत आहे. एक महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर देखील युद्ध अद्याप शमलेलं नाही… ज्याचा परिणाम LPG पुरवठ्यावर होताना दिसत आहे… अशात भारतातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. ज्याचा चटका समान्य जनतेच्या महिन्याच्या बजेटवर पडत आहे. याचदरम्यान, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी पूर्णपणे करमुक्त करण्याची मागणी केली आहे. सीटीआयचा युक्तिवाद आहे की, हे कर हटवल्यास महागाईच्या या काळात जनतेला कुठेतरी मोठा दिलासा मिळेल.

सध्याच्या काळाबद्दल सांगायचं झालं तर, घरगुती गॅस आणि पाईल लईन गॅसवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स स्लॅब लागू आहे… घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांना 5 टक्के टॅक्स भरावं लागत आहे. तर दुसरीकडे हॉटेल, रेस्टोरेंट आणि ढाबे येथे वारण्यात येणाऱ्या कमर्शियल सिलेंडरवर सरकार 18% टॅक्स जीएसटीच्या स्वरुपात भरावं लागतं…

पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस (पीएनजी) सध्या जीएसटीच्या कक्षेत येत नाही. यामुळेच वेगवेगळी राज्य सरकारे त्यावर स्वतःचे व्हॅट दर लावतात. उदाहरणार्थ, दिल्ली पीएनजीवर 5 टक्के व्हॅट लावते, तर काही इतर राज्यांमध्ये हा दर 14.5 टक्के इतका जास्त आहे.

टॅक्स हटवल्यास तुमच्या खिशावर किती फरक पडेल?

सीटीआयच्या मागणीनुसार, जर सरकार घरगुती गॅस सिलेंडरवर असलेला 5% टॅक्स कमी केला तर, किंमतीच मोठी घसरण होईल, सांगायचं झालं तर, अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी जवळपास 913 रुपये मोजावे लागत आहे. टॅक्स हटवल्यानंतर यामध्ये 43 रुपयांची घसरण होईल. म्हणजे गॅस सिलेंडर 869.52 रुपयांमध्ये मिळेल…

सर्वात मोठा दिलासा तर, कमर्शिल गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्यांना होणार आहे… 18 टक्के जीएसटीसोबत उद्योजकांना एका गॅस सिलेंडरसाठी 2 हजार 78 रुपये मोजावे लागत आहेत, जर कमर्शिल गॅस सिलेंडर करमुक्त केल्यास 317 रुपयांना स्वस्त होईल. म्हणजे एका गॅस सिलेंडरसाठी 1,761.44 मोजावे लागतील. यामुळे बाहेरचे पदार्थ देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास
  • आनंदाची बातमी! LPG गॅसची चिंता मिटली, केंद्राचा सर्वात मोठा निर्णय; लाखो भारतीयांना फायदा होणार
  • ‘या’ फळांच्या बियांमध्ये आहे पोषक तत्वांचा खजिना, फेकून देण्याची अजिबात करू नका चुक
  • GK : चलनी कागदी नोटांची सुरुवात कोणत्या देशात झाली?
  • IPL 2026: तीन सामन्यात तीन वाद..! सनरायझर्स हैदराबादचा संताप, बीसीसीआयकडे करणार तक्रार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in