• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Lockdown: मोठी बातमी! देशात टाळेबंदी? संसदेत कुणी उतरवले लॉकडाऊनचे भूत? काय केले मोठे आवाहन

March 27, 2026 by admin Leave a Comment


Nirmala Sitharaman on Lockdown In India: देशात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. जो तो लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवेच्या बाजारात उत्तर शोधत आहे. त्यातच इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. पेट्रोल-डिझेल पंप झाल्याने लोकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची भीती वाढली. याप्रकरणी आता संसदेत सरकारने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने जनतेला मोठे आवाहन केले आहे.

NDA सरकार जनतेच्या सोबत

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे नेहमी जनतेच्या सोबत आहे. ते जनतेच्या हिताचे निर्णय घेते असे केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू म्हणाले. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्यास सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या पाठीशी आहेत. इतर देशात विद्यापीठं, शाळा बंद होत आहेत. पण भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होत आहे. विरोधी पक्षातील नेते अजूनही मोदींना ओळखू शकले नाहीत. पण देशाने त्यांना ओळखले आहे. मोदी हे कुणालाही अडचणीत पाहू शकत नाही. त्यांनी उत्पादन शुल्क घटवून लोकांना मोठा दिलासा दिला आहे.

देशात कोणताही लॉकडाऊन नाही

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की देशात कोणताही लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. काही नेते देशात टाळेबंदी लागणार असे म्हणत असल्याने मला धक्का बसला असे सीतारमण म्हणाल्या. देशात इंधनाचा पुरवठाही मुबलक आहे. या सर्व अफवा आहेत. राजकीय डोमेनमधील लोकांनी अशा गोष्टी केल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. कोविड दरम्यान जसा लॉकडाऊन आहे, तसा कोणताही लॉकडाऊन नाही याची मी जनतेला खात्री देते असे सीतारमण यांनी आश्वासन दिले.

इंधन, एलपीजी परिस्थिती सरकारच्या नियंत्रणात

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय हा या परिस्थितीतील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी सांगितले आहे की चिंतेची वा भीतीची काही आवश्यकता नाही. तर त्यांनी साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांना ताकीद दिल्याचे रिजिजू म्हणाले. इंधन आणि गॅसची स्थिती पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले. तर देशातील सर्वच राज्यातील सरकारला साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in