• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Live-In Relationship: ‘महिलांना मिळावा पत्नीचा दर्जा’, लिव्ह-इन प्रकरणात मद्रास हायकोर्टाचे महत्वाचे भाष्य

January 23, 2026 by admin Leave a Comment


मद्रास हायकोर्टाच्या मदुरई पीठाने अलिकडे लिव्ह-इन प्रकरणात एक महत्वाची टिप्पणी केली आहे. पुरातनकाळात गंधर्व विवाहासारखे एकत्र लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये रहाणाऱ्यांना महिलांना पत्नीचा दर्जा मिळायला हवा. हायकोर्टाने नाते लिव्ह इन शिप नात्यातील महिलांची सुरक्षितता कायम करणे कायद्याचे काम आहे. कोर्टाने टिप्पणी करताना सांगितले की आधुनिक सामाजिक ढाच्या कमजोर महिलांची संरक्षण करण्याची जबाबदार न्यायालयांची आहे.कारण लिव्ह-इन संबंधात त्यांना कायद्याचे तसं संरक्षण मिळत नाही जसे विवाहित महिलांना मिळत असते.

गंधर्व विवाहाचा उल्लेख करत केली टिप्पणी

तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनप्पराई महिला पोलिस ठाण्यात अटक झालेल्या एक व्यक्तीची अंतरिम जामीनाची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. या व्यक्तीवर आरोप होता की त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि नंतर लग्नास नकार दिला. लाईव्ह लॉच्या बातमीनुसार कोर्ट म्हणाले की, लिव्ह – इन रिलेशनशिपमध्ये महिलांना गंधर्व विवाह वा प्रेम विवाहाअंतर्गत पत्नीचा दर्जा देऊन संरक्षण द्यायला हवे. ज्यामुळे अशा संबंधात अस्थिरता होण्याच्या स्थितीत त्यांना पत्नीच्या रुपात अधिकार मिळावे.

काय आहे प्रकरण ?

सरकारी पक्षाच्या अनुसार आरोपी व्यक्ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहाताना महिलेचे शोषण करत होता. या दरम्यान तो लग्नाचे आश्वासन देखील देत होता, परंतू त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. प्रकरणानंतर अटक झाल्यानंतर त्याने जामीनसाठी अर्ज केला होता. ही याचिका फेटाळात कोर्टाने आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 अंतर्गत प्रथम दर्शनी गु्न्हा असल्याचे मान्य केले. हे कलम धोक्याने वा लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक संबंधांना गुन्हेगारी कृत्य मानले जाते.

कायदेशीर डावपेचाविरोधात कठोर टिप्पणी

न्यायमूर्ती एस. श्रीमथी यांनी म्हटले की आधुनिकतेच्या नावाखाली अनेक पुरुष कायदेशीर डावपेचा फायदा उचलत असतात. जेव्हा संबंध बिघडतात तेव्हा महिलांच्या चारित्र्यावर शितोंडे उडवतात.पुरुष स्वत:ला आधुनिक म्हणतात, परंतू नाते तुटताच महिलांना बदनाम करतात.

भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपला भलेही अजूनही सांस्कृतिक रुपाने धक्कादायक मानले जाते. परंतू हे समाजात आता सर्वसामान्य झाले आहेत. अनेक तरुणी आधुनिक जीवनशैली स्विकारताना अशा संबंधांना तयार होतात, परंतू त्यांना नंतर कळते की त्या कायदेशीररित्या तशा सुरक्षित नाहीत, जशा विवाहित महिलांना संरक्षण मिळते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात अचानक खर्च वाढलाय? पैसे पुरत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय
  • Vastu Shastra : तुम्हालाही ऑफीसच्या डेस्कवरच जेवणाची सवय आहे? मग आजच व्हा सावध, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Chanakya Niti : नोकरीत यश मिळवायचं आहे? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवाच
  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in