• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त

April 2, 2026 by admin Leave a Comment


लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.

महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. लातूरमधील शेत मालकाने सांगितले की, 9 लाख रुपये खर्च करुन 10 एकर जमीनीवर कांदा पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना यंदा 30 टन इतकं उत्पादन होण्याची अपेक्षा होती मात्र अवकाळीमुळे 30 किलो पीकदेखील उरलेलं नाही. बळीराजकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे.
दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी
  • अभिनेत्रीचा 14 वर्षांचा संसार मोडला; पतीचे 2-4 नाही तर 9 महिलांसोबत अनैतिक संबंध उघड
  • US, Israel Ceasefire : अमेरिकेनं पाकिस्तानला वेड्यात काढलं, ट्रम्प यांच्याकडून शरीफ, मुनीर यांचा मोठा गेम, रिपोर्टने मोठी खळबळ
  • काय…फास्ट फूडमध्ये वापरला जाणारा ओरेगॅनो आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या हे आरोग्यदायी फायदे
  • 1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in