• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांबाबत अखेर गुडन्यूज आलीच, प्रजासत्ताक दिनी शिंदेंची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा

January 26, 2026 by admin Leave a Comment


ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला. राज्यात महायुतीचे सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं.

दरम्यान जर आमची सत्ता आली तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असं अश्वासन देखील त्यावेळी महायुतीमधील काही नेत्यांकडून देण्यात आले हेते. मात्र आता राज्यात सरकार येऊन एक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे, तरी देखील सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे सन्मान निधीत कधी वाढ होणार? याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.   आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, साताऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय,  अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे.  मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल,  लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं.  योजनेसाठी वर्षाला  45 हजार कोटी रुपयांचा खर्च होता, भल्याभल्यांची हिंमत झाली नाही. ज्यांनी या योजनेत खोडा घातला, त्यांना लाडक्या बहिणींनी 232 नंबरचा जोडा दाखवला.  महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या.  पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान  1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे, तो आम्ही पाळणार आहोत, मी जे बोलतो ते करून दाखवतो अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in