• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका, एका झटक्यात लाखो…

March 10, 2026 by admin Leave a Comment


Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास 2 वर्षांपासून दरमहा 1500 रुपये मिळतात.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलासांठी सरकारने या योजेनेची घोषणा केली आणि कोट्यवधी महिलांना त्याचा लाभ घेतला. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यावर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. ई-केवायसीही बंधनकारक करण्यात आली आहे. याचदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात बीडमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील दोन लाख 83 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. सुरुवातीला कुठलेही निकष न लावता किंवा नियमांचे काटेकोरपणे पालन न करता लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र आता अनेक निकष लावण्यात आलेले असुन काटेकोरपणे त्याचे पालन केले जात असल्याने बीड जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक महिलांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे एकूण 2 लाख 83 हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर सुरुवातीला प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या ही 6 लाख 36 हजार इतकी होती. मात्र आता ही संख्या घटली असून ती एकदम 3 लाख 53 हजारांवर येऊन पोहोचली आहे. ज्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी आहे, ज्तसेच यांच्या घरात नोकरदार आहे, ज्यांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळत आहे किंवा इतर शासकीय योजनेचा दरमहा लाभ घेतला जात आहे, अशा लाडक्या बहिणी आता या योजनेसाठी अपात्रठरत असून त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार नाहीयेत.

लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान गेल्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे यंदा मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. ‘ मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना अशीच सुरु राहणार आहे. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे’ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle : आशाताईंची ती इच्छा होणार पूर्ण, राज्य सरकारचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय!
  • बापरे! या अभिनेत्रीने 10 कोटींमध्ये बांधलेलं घर 100 कोटींना विकलं, घराचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल…
  • Asha bhosle | स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंचे अंत्यदर्शन
  • ओला इलेक्ट्रीकची नवीन ई-स्कूटर S1 X+ 5.2 kWh लाँच, रेंज आणि किंमत किती पाहा
  • श्वेता तिवारीला कोण म्हणेल 25 वर्षांच्या मुलीची आई, ग्लमरस लूक पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in