• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin: 1500 रुपये हप्ता आमच्या संसारात..; ‘लाडकी बहीण’ चित्रपटाची जोरदार चर्चा; गौतमी पाटीलची खास गवळण

March 9, 2026 by admin Leave a Comment


काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचं काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजने’चं समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील ‘लाडकी बहीण’ चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच ‘लाडकी बहीण’ रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. ‘1500 रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ असं म्हणत ‘लाडकी बहीण’ हा आगामी चित्रपट येत्या 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘लाडकी बहीण’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका शितल शिंदे असून या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं ‘लाडकी बहीण’ हे शीर्षक खूप विचार करायला लावणारं आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचे संकेत पोस्टरवर दिलेल्या टॅगलाईनवरून मिळतात. हा चित्रपट फक्त शासकीय योजनेवर भाष्य करणारा आहे की, यात आणखी काही नाट्यमय घडामोडी दडलेल्या आहेत याबाबतही कुतूहल वाटतं. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

एखादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…’ या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू ‘लाडकी बहीण’मध्ये आहे. सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे. आशयघन गोष्ट, उत्कंठावर्धक घडामोडी, सर्वसामान्यांच्या भावना, सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य, लक्षवेधी अभिनय आणि एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल असा ठाम विश्वास दिग्दर्शक शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?
  • Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा
  • या कालावधीत लोकल सेवा रद्द… रविवारच्या मेगा ब्लॉकचा टायमिंग पटकन चेक करा, नाहीतर घराबाहेर पडताच…
  • Delnaaz Irani : लग्न, घटस्फोट, पोटगी आणि…, अनेक वर्षांनंतर खासगी आयुष्यावर अभिनेत्री स्पष्टच बोलली
  • महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in