• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Korean Glass Skin Secret : तुम्हालाही हवीये काचेसारखी चमकदार त्वचा ? मग हे पदार्थ खाऊनच पहा..

February 7, 2026 by admin Leave a Comment


Diet For Korean Glass Skin : जर तुम्हालाही कोरियन मुलींसारखी स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसणारी त्वचा हवी असेल, तर फक्त स्किनकेअर पुरेसं नाही. त्यांच्या त्वचेच्या सौंदर्यामागचं खरं गुपित त्यांच्या आहारात दडलेलं आहे. त्या कोणताही कडक डाएट फॉलो करत नाहीत; उलट त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयीच अशा असतात ज्या त्वचेला आतून पोषण देतात. साधं, ताजं आणि संतुलित अन्न घेतल्यामुळे त्वचा निरोगी राहते, नैसर्गिक ग्लो येतो आणि चेहऱ्यावर कायम फ्रेशपणा दिसून येतो.

डाएट तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरियन लोकांच्या चमकदार आणि टवटवीत त्वचेचं रहस्य फक्त के-ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये नाही, तर त्यांच्या आहारात आहे. ते जे खातात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो. कोरियन डाएटमध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या त्वचेला निरोगी, फ्रेश आणि नैसर्गिकरित्या चमकदार ठेवतात ते आज जाणून घेऊया..

हायड्रेशनकडे विशेष लक्ष :

कोरियन लोक केवळ भरपूर पाणी पिण्यावरच भर देत नाहीत, तर पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थही आहारात समाविष्ट करतात. काकडी, टरबूज यांसारखी फळं आणि भाज्या त्यांच्या रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग असतात. यामुळे शरीरासोबतच त्वचाही आतून हायड्रेट राहते. त्वचेला पुरेसं पाणी मिळालं की ती अधिक निरोगी दिसते आणि नैसर्गिक चमक आपोआप येते.

प्रत्येक जेवणात फर्मेंटेड पदार्थांचा समावेश :

कोरियन आहारात किमचीला विशेष महत्त्व आहे. नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण प्रत्येक वेळी किमची खाल्ली जाते. फर्मेंटेड पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवायला मदत करतात. जेव्हा गट हेल्थ चांगली असते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवरही दिसतो. निरोगी पचनामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि तेजस्वी दिसते तेही कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटशिवाय.

मासे आहाराचा महत्त्वाचा भाग :

कोरियन लोक नियमितपणे मासे आणि टोफू खातात. यामुळे शरीराला ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि कोलेजन मिळते. हे घटक त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात, एजिंगचे परिणाम कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. योग्य आणि संतुलित आहार कोणत्याही क्रीम किंवा सीरमपेक्षा अधिक प्रभावी ठरतो.

भरपूर प्रमाणात भाज्यांचं सेवन :

कोरियन जेवणात विविध प्रकारच्या भाज्यांचा मुबलक वापर असतो. भाज्यांमधून फायबर, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक मिळतात. हे शरीरातील सूज कमी करतात, त्वचेला निरोगी ठेवतात आणि वाढत्या वयाचे परिणाम नैसर्गिकरीत्या मंदावतात.

हेल्थ आणि स्किन यांचा थेट संबंध :

कोरियन डाएटवरून स्पष्ट होतं की पचनसंस्था जितकी मजबूत, तितकी त्वचा अधिक सुंदर. किमचीसारख्या फर्मेंटेड पदार्थांतून प्रोबायोटिक्स, माशांमधून ओमेगा-3, तर पाणी आणि भाज्यांमधून संपूर्ण पोषण मिळतं. जेव्हा पोट निरोगी राहतं, तेव्हा त्याची झळक चेहऱ्यावर आपोआप दिसून येते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Valentine’s Week 2026 : कधी सुरू होतो व्हॅलेंटाइन वीक ? कोणत्या दिवसाचं काय महत्व, घ्या जाणून
  • PAK vs NED T20 WC Result: पाकिस्तानची धडपडत विजयी सुरुवात, नेदरलँडला 3 विकेटने नमवलं
  • U19 world cup 2026 : U19 वर्ल्ड चँपियन्सवर BCCI मेहरबान, कोट्यवधींचं बक्षीस जाहीर !
  • रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
  • ‘तो’ भयानक शापित टीव्ही शो… 2 अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य… तिसरीने तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in