
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने कोलकातासमोर 227 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. या विजयी धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने केकेआरला 16 ओव्हरमध्ये 161 रन्सवर गुडाळलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना 65 धावांनी जिंकला आणि पहिल्या पराभवानंतर आपल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर केकेआरला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. केकेआर या मोसणात आतापर्यंत घरच्या मैदानात सामना गमावणारी पहिली टीम ठरली.
Leave a Reply