
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमेनसामने असणार आहेत. कोलकाताचा हा चौथा तर लखनौचा तिसरा सामना असणार आहे. लखनौने 3 पैकी 1 सामनाच जिंकला आहेत. तर केकेआरला अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. केकेआरने पहिले 2 सामने गमावले. तर केकेआरचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे केकेआरच्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे आता केकेआर घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरणार की लखनौ ट्रॅकवर परतत दुसरा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना कधी?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना गुरुवारी 9 एप्रिलला होणार आहे.
कोलकाता विरुद्ध लखनौ कुठे?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डन्समध्ये होणार आहे.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरीस चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
कोलकाता विरुद्ध लखनौ सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
Leave a Reply