• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Khamenei Death: जर मी तिथे गेली, तर माझ्यावर…, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

March 5, 2026 by admin Leave a Comment


Elnaaz Norouzi on Khamenei Death: 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यात निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेच्या अनेक ठिकाणांवर इराणने हल्ले केले… गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरु आहे आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे तणावग्रस्त वातावरण आहे… दरम्यान 2015 मध्ये भारतात आलेल्या एल्नाझ नोरौजी हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, एल्नाझ नोरौजी इराण येथील आहे आणि आता तिला स्वतःच्या मायदेशी जाण्यास देखील भीती वाटत आहे.

एल्नाझ नोरौजी म्हणाली, इराण येथील लोकांना सत्य कळत नाही. अभिनेत्री आई – वडील परदेशात राहतात. पण तिचे अनेक नातेवाईक आजही इराण येथे राहतात.. 2018 नंतर एल्नाझ नोरौजी तिच्या मायदेशी गेलीच नाही… अभिनेत्री म्हणाली, आज दिसणारा संघर्ष अनेक दशकांपासून सुरू आहे आणि बाहेरील लोकांना अनेकदा इराणमधील खरी परिस्थिती समजत नाही. बहुतेक इराणी लोक इस्लामिक रिपब्लिकच्या विचारसरणीशी असहमत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, देशातील लोकसंख्या सुशिक्षित आणि माहितीपूर्ण आहे आणि त्यांना चांगलं राजकीय भविष्य हवं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘जर आपण इराणबद्दल बोलत आहोत तर, इस्लामिक रिपब्लिक आणि तेखील लोकांमधील फरक ओळखणं फार महत्त्वाचं आहे. मी इराणमध्ये पाऊन देखील ठेवू शकत नाही… मी तेथे गेली तर, ते मला मारुन टाकतील..’, 2022 मध्ये महसा अमीनी यांच्या मृत्यूनंतर देशभर आंदोलनं झाली. तेव्हा लोकांनी सरकार विरोधान आवाज उठवला…

अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, ‘नुसतं बोलल्याने तेथील नागरिक तुरुंगात जाऊ शकतात… हेच कारण आहे, मला कायम माझ्या कुटुंबाची चिंता वाटत असते. सध्या मला माझ्या कुटुंबियांची प्रचंड भीती वाटत आहे… अनेकांना देश सोडायचा आहे, पण बाहेर येणं सोपं नाही… व्हिजा… पैसे आणि कायद्याच्या अटी पूर्ण करणं सर्वांसाठी शक्य नाही…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एल्नाझ नोरौजी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, हिचा जन्म इराण येथे झाला. जर्मनी येथे अभिनेत्रीने शिक्षण पूर्ण केलं. अभिनेत्रीने 2017 मध्ये पाकिस्तानी सिनेमांमधून करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने ‘सेक्रेड गेम्स’, ‘अभय’ आणि ‘मेड इन हेवन’ यांसारख्या सिनेमांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in