• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kavya Maran: काव्या मारनच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूवर लावला डाव, SRH संघ नेटकऱ्यांच्या रडारवर

March 12, 2026 by admin Leave a Comment


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्याचा परिणाम आयसीसी क्रिकेट स्पर्धेतही दिसून आला. भारतीय संघाने तर हस्तांदोलन करणंही टाळलं. इतकंच काय तर आशिया कप ट्रॉफी भारतीय संघाने मोहसिन नक्वीच्या हातून घेतली नाही. त्यामुळे पाकिस्तानवर किती राग आहे दिसून येतं. असं असताना काव्या मारनची फ्रेंचायझी द हंड्रेड 2026 स्पर्धेच्या लिलावात पाकिस्तानी खेळाडू खरेदी याचा कोणीही विचार केला नव्हता. काव्या मारनची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला विकत घेतलं आहे. त्यासाठी फ्रेंचायझीने 2.34 कोटी रूपयांची रक्कम मोजली आहे. त्याच्यासाठी बोली लावताना ट्रेंट रॉकेट्स संघ स्पर्धेत होता. पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने मोठी बोली लावली आणि अबरारला आपल्या संघात घेतलं. पण पाकिस्तानी खेळाडू खरेदी केल्याने आता काव्या मारनची फ्रेंचायझी रडारवर आली आहे. सनरायझर्स लीड्सचा निर्णय लज्जास्पद असल्याचं सांगितलं आहे.

सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडूसाठी बोली लावली आणि त्याला संघात घेतल्याने सोशल मीडियावर रान पेटलं आहे. काव्या मारन आणि तिच्या द हंड्रेड फ्रेंचायझीवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच काय तर काही जणांनी तर आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अबरार अहमद 2009 नंतर भारतीय संघाच्या मालकाने खरेदी केलेला पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बांगलादेशसोबतचे संबंध बिघडल्यानंतर आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानला काढलं होतं. त्यामुळे वाद होणार हे आता तितकंच खरं आहे.

What about Abrar Ahmed ? He is purchased by Sunrisers

— vaibhav singh (@vs478642) March 12, 2026

Indian fan should boycott SRH on IPL 2026. sorry Abhishek Sharma & Ishan Kishan.

Shame on Sunrisers for buying pakistani player Abrar Ahmed who hates India and spread anti Indian propoganda on social media.

Abrar Ahmed is a open hater of India unlike Bangladesh Mustafizur… https://t.co/HSnTeKY53m

— CricPal (@AnupPalAgt) March 12, 2026

Finally, a Pakistani player has been picked by an Indian-owned franchise!

Sunrisers Leeds, led by owner Kavya Maran, saw Daniel Vettori express interest in mystery spinner Abrar Ahmed.

The franchise eventually won the bidding war against Trent Rockets, securing him for £190,000 https://t.co/o5SN3Q95MQ pic.twitter.com/gpgJFcuQmg

— Pavilion Post (@CricinsightsX) March 12, 2026

अबरार अहमद टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फेल गेला. त्याने 4 सामन्यात फक्त 6 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेटही काही खास नव्हता. भारत पाकिस्तान सामन्यात त्याने 38 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. असं असताना त्याच्यासाठी बोली लावणं हे काय भारतीय क्रीडाप्रेमींना रूचलं नाही. त्यामुळे आता विरोधाची आणखी तीव्र होणार यात काही शंका नाही.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…
  • Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, युद्धविरामानंतर 3 दिवसांनी… सोन्याचे आजचे दर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in