• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Job Alert : 10 वी पास आहात? मगही बातमी तुमच्यासाठीच.. हमखास मिळेल नोकरी ! 50 हजार पदांसाठी भरती, कुठे कराल अप्लाय ?

February 3, 2026 by admin Leave a Comment


Job Alert : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांसाठी फेब्रुवारी महिना फायदेशीर ठरत आहे. एकीकडे, 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या 2026 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रोजगारानिर्मिती बद्दल अनेक घोषणा केल्या. तसेच तर फेब्रुवारी महिन्यात अनेक मोठ्या भरतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, देशातील दोन प्रमुख विभागांनी दहावी उत्तीर्णांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्या अंतर्गत 50 हजारांहून अधिक पदांसाठी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तसेच अग्निवीर म्हणून काम करणाऱ्या सैनिकांसाठी एक मोठी अपडेट आहे.

देशातील दोन विभागांमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी भरती अर्ज प्रक्रियेबद्दल आणि अग्निवीरांना निवृत्तीपूर्वी मिळू शकणाऱ्या संभाव्य भेटीबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

रेल्वे ग्रुप Dमध्ये 21 हजार पदांवर भरती

इंडियन रेल्वे ग्रुप डी भरती 2026 ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, ज्याअंतर्गत आता 21 हजार 997 ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. देशभरातील दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 2 मार्च 2026 ही यासाठीच्या अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख आहे. तर यासाठी फी भरण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2026 ही आहे. अर्ज भरण्यासाठी करेक्शन विंडो 5 ते 14 मार्च पर्यंत खुली असेल. यालाठी अर्ज ऑनलाइन सादर करता येतील.

इंडिया पोस्टमध्ये दहावी पाससाठी 28 हजार पदं रिक्त

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवा (GDS) भरती 2026 ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. इंडिया पोस्ट एकूण 28 हजार 740 पदं भरण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये याची सर्वाधिक पदं असतील. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 14 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासांठी अर्ज करू शकतात. त्याासाठीची निवंड ही 10 च्या गुणवत्तेवर आधारित असेल. भरती प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

निवृत्तीपूर्वी अग्निवीरांना ॲडजस्ट करण्याची तयारी

अग्निवीरांची पहिली तुकडी या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होण्याची अपेक्षा आहे. निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना सामावून घेण्यासाठी बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. अहवालानुसार, गृह मंत्रालयाने या प्रकरणावर काम सुरू केले आहे. निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांसाठी ॲडजस्टमेंट प्लानवर काम करण्यासाठी मंत्रालयाने वरिष्ठ निमलष्करी अधिकाऱ्यांची अंतर्गत समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या निवृत्तीपूर्वी या प्रकरणातील धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जाते.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बहिणीत फक्त 6 महिन्याचा गॅप? असं कसं? नेटकरी लागले डोकं आपटायला
  • Bigg Boss Marathi 6: राकेश बापटची पहिली बायको पुन्हा अडकणार विवाहबंधनत! तिचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन
  • मीरा भाईंदरच्या महापौर पदी डिंपल मेहता यांची निवड
  • रिलीजपूर्वीच हा चित्रपट ठरणार 2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर? थिएटरबाहेर तिकिटासाठी लागणार रांगा, टीझर पाहूनच….
  • US-India Trade Deal: भारत-अमेरिकेचे जुळले सूर, व्यापारी करारावर शिक्कामोर्तब, पडद्यामागील सूत्रधार कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in