• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Israel Iran War : पुतिन अमेरिका, इस्त्रायलवर संतापले, घेतला सर्वात मोठा निर्णय, रशिया आता अ‍ॅक्शन मोडमध्ये

March 9, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रालय आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. यामुळे आता मध्य पूर्वेमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. मध्य पूर्वेमधील तणाव वाढतच असल्यानं आता यावर रशियाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला असून, आंतरराष्ट्रीय कायदे संपल्यात जमा आहेत, असं रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलचं इराण विरोधात युद्ध सुरूच असून, आज या युद्धाचा 9 दिवस आहे. दरम्यान आता रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायाला मिळत आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता पुतिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी ‘पी5’ म्हणजेच यूएन सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. या पाच देशांची बैठक बोलवावी असं त्यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात बोलताना रशियाचे प्रवक्ता दिमित्री पेसकोव्ह यांनी म्हटलं की, सध्या सर्व आंतरराष्ट्रीय कायदे हे फक्त कागदावरच आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये उघड- उघड या कायद्यांचं उल्लंघन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आता संपले आहेत. जग सध्या अशा पॉइंटवर आहे, जिथे कोणाकडूनही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनाची अपेक्षा तुम्ही करू शकत नाहीत. आज आपण ती गोष्ट गमावली आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय कायदा म्हणतो. याचे गंभीर स्वरुपाचे आर्थिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आता आमच्याकडून ‘पी5’ म्हणजेच यूएन सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांच्या बैठकीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वी देखील रशियाच्या राष्ट्रपतींनी इराणच्या राष्ट्रपतींना फोन केला होता. यु्द्ध थांबवून शांततने मार्ग काढावा असं आव्हान केलं होतं. तर इराणच्या राष्ट्रपतींनी पुतिन यांना युद्धाची माहिती दिली होती. तर दुसरीकडे चिनने देखील या यु्द्धावर चर्चेद्वारे तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. तसचे चीनकडून डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलंच सुनावण्यात आलं आहे. क्रांती घडवून आणणे किंवा एखाद्या देशाची सत्ता उलथून लावणे याला आमचा कधीच पाठिंबा नसणार असं चीनने म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानला गेलेल्या इराणी शिष्ठमंडळातील नेत्यांच्या डिग्रीची का होत आहे चर्चा ?
  • Shiv Sena | आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं, भर मंचावरच…
  • IPL 2026: चेन्नई-दिल्ली सामन्यात काय घडलं? ऋतुराज गायकवाडला शिक्षा, तर नितीश राणाला ठोठावला दंड
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना या 4 गोष्टी आवर्जून तपासा
  • गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताय तर नक्की लक्षात ठेवा ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in