• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Israel Iran War : आता युद्धात चायनाची एन्ट्री, डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त धक्का, चीनकडून भूमिका जाहीर

March 8, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ या तीन देशांसोबतच इतर अनेक देशांना देखील बसली आहे. इराणकडून फक्त अमेरिका आणि इस्त्रायलवरच हल्ले करण्यात येत नाहीयेत, तर अनेक आखाती देशांवर देखील इराणने हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान जोपर्यंत इराण कोणत्याही अटीशिवाय सरेंडर करणार नाही, तोपर्यंत इराणवर हल्ले सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाही. आम्ही सरेंडर होणार नसल्याचं इराणने म्हटलं आहे. तसेच इराणने आता आपल्या हल्ल्यांची तीव्रता देखील वाढवली आहे. दरम्यान युद्धाच्या नवव्या दिवशी आता मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. आता या वादात चीनने देखील उडी घेतली आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठं आव्हान केलं आहे, सैन्य कारवाई हा यावरील पर्याय नाहीये, चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवला जावा असं चीनने म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील चांगलंच सुनावलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलं की, इराण आणि आखाती देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि सुरक्षेचा कोणत्याही परिस्थितीमध्ये आदर केला गेला पाहिजे. त्यामुळे युद्ध कारवाई टाळून दोन्ही बाजूंनी वाटाघाटीसाठी प्रयत्न करावेत, हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला जावा असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

मात्र दुसरीकडे चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मोठा धक्का दिला आहे, आपल्याला इराणची राजवट उलथून लावायची आहे, सत्ता परिवर्तन करायचं आहे, असं काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी म्हटलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना चीनने ट्रम्प यांना जबर धक्का दिला आहे. कोणत्याही देशात क्रांती घडवून आणणे किंवा सत्ता परिवर्तन घडवून आणणे याला आपला पाठिंबा नसल्याचं चीनने म्हटलं आहे. चीनकडून आलेली ही प्रतिक्रिया आता ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का माण्यात येत आहे. चीन नेहमीच आपल्या प्रादेशिक सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. वेळ पडली तर चीन भविष्यात आपले प्रयत्न अधिक तीव्र करेल असंही वागं यी यांनी म्हटलं आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यात अश्रू, हात जोडलेले… आशा भोसलेंच्या निधनावर मुलाची प्रतिक्रिया
  • Asha Bhosle Passed Away | संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन
  • 83 वर्षापूर्वी आशा भोसले यांनी गायलं होतं पहिलं गाणं, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत
  • भारतातील श्रीमंत गायिकांमध्ये आशा भोसले यांचा समावेश, जाणून घ्या संपत्ती
  • Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in