• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran US Israel War Update : युद्धात इराणचं रौद्र रुप पाहून ट्रम्प यांचे पाय डगमगले, अमेरिका घाबरली, हे घ्या त्याचे दोन ढळढळीत पुरावे

March 17, 2026 by admin Leave a Comment


इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन नौदलाची भूसुरुंग शोधणारी आणि हटवणारी तीन पैकी दोन जहाजं मिडिल ईस्टपासून लांब दिसली आहेत. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. USS टुल्सा आणि USS सांता बरबरा या दोन जहाजांना मलेशियाच्या पेनांग राज्यातील नॉर्थ बटरवर्थ कंटेनर टर्मिनलवर पाहण्यात आलय. या जहाजांचा बेस बहरीमध्ये आहे. तिथून ती 3500 मैल अंतरावर दिसली आहेत. सामान्यत: ही जहाजं मिडिल ईस्टमध्ये तैनात असतात. ही जहाजं US नौदलाच्या पाचव्या फ्लीटचा भाग आहेत.

या जहाजांना तिथून हटवून मलेशियात का पाठवण्यात आलय? ते अजून स्पष्ट नाहीय. अमेरिकी सेंट्रल कमांड आणि इंडो-पॅसिफिक कमांडने अजून यावर काही उत्तर दिलेलं नाही. पेंटागनने सुद्धा थेट काही सांगितलेलं नाही. या विषयाला इंडो-पॅसिफिक कमांडकडे पाठवलं आहे. ही दोन्ही जहाजं इंडिपेंडेंस क्लासची आहेत. समुद्रात पेरण्यात आलेली भूसुरुंग शोधून ती हटवण्याची खास सिस्टिम या जहाजांमध्ये आहे. स्फोटकांचा शोध लावून ती निष्क्रिय करण्यासाठी अंडरवॉटर ड्रोन, सोनार आणि हॅलिकॉप्टरचा वापर होतो.

एक्सपर्ट्सचं म्हणणं काय?

इराणने बहरीनमध्ये ड्रोन, मिसाइल हल्ले केले आहेत. कदाचित ते या जहाजांना लक्ष्य करु शकतात ही भिती असू शकते.
तिसरं जहाज USS कॅनबरा अजूनही आखातामध्ये असल्याचं सांगण्यात येतय. आधी अमेरिकेकडे चार जुनी एवेंजर क्लासची भूसुरुंग हटवणारी जहाजं होती. पण मागच्यावर्षी ती काढून टाकण्यात आली. आता ही नवीन जहाजं त्या ठिकाणी हे काम करणार आहेत. काही एक्सपर्ट्सनुसार या नव्या जहाजांची टेक्निक अजून खऱ्या युद्धात सिद्ध झालेली नाही. ही जहाजं आकारमानात मोठी आहेत.

ट्रम्प यांनी कोणाकडे मदत मागितली?

ब्रिटनचे ऊर्जा मंत्री एड मिलिबँड म्हणाले की, गरज पडल्यास आमचा देश भूसुरुंग हटवणारे ड्रोन्स पाठवू शकतो. जपान आणि ऑस्ट्रेलियाने स्पष्ट शब्दात सांगितलय की, ते सध्या हॉर्मुज स्ट्रेटमध्ये सैन्य संसाधन पाठवण्यावर विचार करत नाहीयत. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि यूकेकडे हॉर्मुझ स्ट्रेट ओपन करण्यासाठी मदत मागितली होती.

इराणने किती हजार भूसुरुंग पेरले असतील?

गोपनीय संस्थांच्या अंदाजानुसार इराणने जहाजांचा मार्ग रोखण्यासाठी समुद्राच्या तळाशी किंवा त्याच्या पृष्ठभागावर 5,000 पेक्षा जास्त भूसुरुंग पेरलेले असू शकतात. यात स्फोटकं आहेत. मागच्या आठवड्यात अमेरिकेने सांगितलेलं की, माइन्स पेरणाऱ्या इराणच्या 16 बोटी आम्ही नष्ट केल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in