• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran-Us Ceasefire : जगाची चिंता वाढवणारी बातमी ! पाकिस्तानात नको ते घडलं… इराण-अमेरिकेतील चर्चा… युद्धाचं काय होणार ?

April 12, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. अमेरिका-इराण युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि शांततेसाठी त्यांची चर्चा सुरी होती. मात्र अमेरिका आणि इराण, य़ा दोघांमधील तील वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी रविवारी पहाटे पत्रकार परिषद घेत जाहीर केलं की, ते इराणसोबत कोणताही करार न करता वॉशिंग्टनला परतणार आहेत. इराण अमेरिकेच्या अटी स्वीकारत नाहीये त्यामुळे शिष्टमंडळ अमेरिकेत परत जात असल्याचं व्हान्स म्हणाले.

जेडी व्हान्स यांनी आज (12 एप्रिल) पहाटे घेतलेल्या पत्रकार परिशषदेत या चर्चेसंबंधी माहिती दिली. इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये त्रुटी राहिल्या असून, इराणी शिष्टमंडळाने वॉशिंग्टनच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. अमेरिका करारासाठी तयार आहे, परंतु इराणने मोठे अडथळे निर्माण केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

दोन्ही देशातील चर्चा फिस्कटली…

‘ वाईट बातमी ही आहे की, आमच्यात करार झालेला नाही. मला वाटते की ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त वाईट बातमी आहे. त्यामुळे, कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेकडे परत जात आहोत… त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे.’ असं या निवेदनादरम्यान जेडी व्हान्स म्हणाले. ” या चर्चेत ज्या काही उणिवा होत्या, त्या पाकिस्तानींमुळे नव्हत्या; त्यांनी उत्कृष्ट काम केलं आणि आम्हाला व इराणला मतभेद मिटवून करारापर्यंत पोहोचण्यास मदत करण्याचा खरोखरच प्रयत्न केला. आम्ही गेल्या 21 तासांपासून वाटाघाटी करत आहोत आणि इराणींसोबत अनेक महत्त्वाच्या चर्चा केल्या आहेत.” असंही व्हान्स यांनी नमूद केलं.

 

#WATCH | US-Iran peace talks | Islamabad, Pakistan: US Vice President JD Vance says, “…The bad news is that we have not reached an agreement. I think that is bad news for Iran much more than it’s bad news for the USA. So, we go back to the US having not come to an… pic.twitter.com/jWHpJYemYz

— ANI (@ANI) April 12, 2026

ही बातमी अपडेट होत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानचा वाईट काळ सुरु, इस्लामाबादवर कोसळणार मिसाइल्स?
  • 20-30 दिवस नाही तर 3 महिन्यांपासून ओटीटीवर ही सीरिज होतेय ट्रेंड; मराठी अभिनेत्रीची भूमिका
  • पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत भाजपकडून मित्रांचीच शिकार… रोहित पवारांनी दिली पक्की बातमी, म्हणाले
  • Maharashtra News LIVE : बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग, सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार
  • 19 व्या वर्षी कशी दिसायची जीनत अमान, 70 च्या दशकातील अभिनेत्रीचे 15 बोल्ड फोटो व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in