• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..

April 12, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेली 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली, काहीच ठोस तोडगा न निघाल्याने ही चर्चा अनिर्णित अवस्थेत संपली. त्यामुळे सगळ्या जगाचं टेन्शन वाढलं असून युद्धाचे ढग पुन्हा घोंगावणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. इराण सोबत झालेल्या चर्चेबाबात बोलताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स म्हणाले होतो की, या चर्चेबाबत चांगली आणि वाईट दोन्ही बातमी आहे.”चांगली बातमी अशी की दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पण वाईट बातमी अशी की या चर्चेत एकमत न झाल्याने, कोणताही ठोस करार न करता आम्ही पाकिस्तान सोडत आहोत.” पुढे त्यांनी असंही सांगितलं की इराणला अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव देण्यात आला आहे, मात्र आता तो स्वीकारायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. दरम्यान व्हान्स यांच्या निवेदनानंतर इराणनेही आपली बाजू मांडली असून अमेरिकेच्या “फालतू मागण्यांमुळे” ही चर्चा अयशस्वी झाली.

इराणचं म्हणणं काय ?

“राष्ट्रीय हितसंबंध आणि इराणी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी इस्लामाबादमधील इराणी शिष्टमंडळाने अमेरिकेसोबत 21 तास चर्चा केली,” असं इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने टेलिग्रामवर कळवलं. इराणी शिष्टमंडळाची सकारात्मक भूमिका असूनही, अमेरिकेकडून अवाजवी मागण्या करण्यात आल्या. यामुळेच चर्चा थांबली आणि कोणत्याही ठोस करार किंवा एकमताशिवाय संपली, असं त्यात नमूद करण्यात आलं. आज पहाटे, जे.डी. व्हान्स यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच इराणतर्फे हे निवेदन जारी करण्यात आले. जर इराणने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला, तर एक सकारात्मक परिणाम अजूनही शक्य असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नमूद केलं होतं.

21 तासांची चर्चा फिस्कटल्यानंतर जे.डी व्हान्स यांनी आज पत्रकार परिषद घेत संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की , वाईट बातमी अशी की इराणने अमेरिकेच्या अटी स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यांना अण्वस्त्र निर्मिती थांबवायची सुद्धा इच्छा नाही. अण्वस्त्रांवर बंदी घालणे हे अमेरिकेचे प्राथमिक ध्येय आहे, जे इराण स्पष्टपणे स्वीकारण्यास नकार दिल्याचंव्हान्स यांनी नमूद केलं. “वाटाघाटींच्या माध्यमातून आम्हाला इराणला हे समजावून सांगायचं होतं, पण ते काहीच समजून घेण्यास तयारच नाहीत. या चर्चेनंतर आम्ही करारावर पोहोचू शकलो नाही. ही केवळ इराणसाठीच नव्हे, तर अमेरिकेसाठीही वाईट बातमी आहे.” असंही व्हान्स यांनी सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशीही बातचीत

इस्लामाबादमध्ये आल्यावर इराणशी चर्चेदरम्यान व्हान्स यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही सुमारे सहा वेळा चर्चा केली. 47 वर्षांत प्रथमच अमेरिका आणि इराण या स्तरावर चर्चा करत होते. व्हान्स यांच्या पथकात विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई, जेरेड कुशनर, जे त्यांचे मुख्य सल्लागारही आहेत, यांचा समावेश होता. इराणच्या शिष्टमंडळात संसद अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांचा समावेश होता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतातील श्रीमंत गायिकांमध्ये आशा भोसले यांचा समावेश, जाणून घ्या संपत्ती
  • Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ
  • Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण
  • आदित्य ठाकरे यांची निष्ठा तपासणार का? कंम्बोज भेटीवरून शिंदे गोटातून धडाडली तोफ, जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नाला उद्धव सेना उत्तर देणार?
  • संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देत म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in