• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran Toll Oil : हॉर्मुजमध्ये इराणने जर 1 बॅरल तेलावर 1 डॉलर आकारला, तर दरदिवशी भारताचं किती कोटींचं नुकसान होईल? मोठा फटका बसेल

April 9, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिकेत सीजफार झालं आहे. दोन आठवड्यांसाठी ही सीजफायरची घोषणा झाली आहे. ठरल्यानुसार इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करायचं होतं. जेणेकरुन तिथे जल वाहतूक सुरळीत होईल. पण लेबनॉनवर इस्रायली हल्ल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद करण्यात आलं आहे. असं बोललं जातय की, इराण आता हॉर्मुज स्ट्रेट मधून जल वाहतूक करणाऱ्या जहाजांवर टोल आकारणी करणार आहे. आमच्या परवानगीशिवाय एकही जहाज इथून गेलं तर त्यावर हल्ले करु असा इराणने इशारा दिला आहे. फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार इराण आता हॉर्मुज स्ट्रेट मधून वाहतूक करणाऱ्या तेल टँकर्ससाठी शिपिंग कंपन्यांकडून टोल वसुली करणार आहे.

“प्रत्येक जहाजाला त्यांच्याकडे काय सामान आहे, या बद्दल ईमेल करुन माहिती द्यावी लागेल. त्यानंतर क्रिप्टोमध्ये किती टोल द्यायचा हे इराण त्यांना सांगेल. 1 बॅरल तेलावर 1 डॉलर टोल आकारला जाईल. रिकामी टँकर कुठल्याही तपासणीशिवाय जाऊ शकतात” असं इराणचे तेल, गॅस आणि पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स यूनियनचे प्रवक्ते हामिद होसैनी यांनी सांगितलं. हॉर्मुजच्या मार्गाने काय-काय आणलं जातय यावर लक्ष ठेवण्यासाठी इराण असं करणार आहे.

इराणची मागणी मान्य करण्यात नुकसान काय?

आता जो करार झाला आहे, त्यात हॉर्मुज स्ट्रेट सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. 28 फेब्रुवारीच्या आधी म्हणजे युद्ध सुरु होण्याआधी कुठल्याही चेकिंगशिवाय या मार्गावरुन जहाजांची ये-जा सुरु होती. पण आता इराणने हा मार्ग बंद करुन ठेवलाय. इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर पूर्ण नियंत्रण हवं आहे. ती त्यांची मुख्य मागणी आहे. सध्या दोन आठवड्यांसाठी सीजफायर झालं आहे. पण हॉर्मुज पूर्णपणे खोलण्याच्या अटीवरच कायमस्वरुपी तोडगा निघू शकतो. इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये टोल वसुलीची परवानगी दिली, तर यामुळे आखाती देशांवरील दबाव वाढेल. मिडिल ईस्टमधील एक शक्तीशाली देश अशी इराणची प्रतिमा तयार होईल.

भारताचे दरदिवशी टोलपोटी किती कोटी जातील?

भारताला दरदिवशी 55 लाख बॅरल कच्चा तेलाची गरज लागते. हे कच्चं तेल 40 पेक्षा जास्त देशातून येतं. एक चांगली बाब ही आहे की, आधी 55 टक्के कच्च तेलं हॉर्मुज मार्गे यायचं. पण आता 30 टक्के कच्च तेलचं हॉर्मुज मार्गे येतं. 55 लाख बॅरलचे 30 टक्के होतात 16.5 लाख बॅरल. म्हणजे दरदिवशी 16.5 लाख बॅरल कच्च तेलं हॉर्मुज मार्गे येणार. 1 बॅरल म्हणजे तेलाच्या प्रति पिंपावर 1 डॉलर टोल लागल्यास भारताला दरदिवशी 16.5 लाख डॉलर भरावे लागतील. भारतीय करन्सीच्या हिशोबाने हे दरदिवशी जवळपास 15 कोटी रुपये होतात. त्या हिशोबाने भारताला दरवर्षी साडेपाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तचा टोल द्यावा लागेल. हा अतिरिक्त साडेपाच हजार कोटी रुपयांचा खर्च एकतर सरकार उचलेल किंवा तेल कंपन्या. पण पेट्रोल-डिझेलची किंमत वाढवूनच त्याची वसुली करतील.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात होईल दूर, फक्त सात दिवस करा हा सोपा उपाय
  • डास पुन्हा घरात येणारच नाहीत, 5 रुपयांच्या टोमॅटोचा करा हा सोपा उपाय, आता उन्हाळ्यात बिनधास्त खिडक्या उघड्या ठेवा
  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in