• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran-Israel War : युद्ध लढताना इराणकडून सर्वात मोठी चूक, आणखी एका बलाढ्य देशाशी दुश्मनी घेतली ओढवून

March 13, 2026 by admin Leave a Comment


इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे मिडिल ईस्टमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. इराणकडून इस्रायलसह अमेरिकेच्या आखाती देशांमधील एअर बेसेसवर हल्ले सुरु आहेत. अशाच एका हल्ल्यादरम्यान इराणने मोठी चूक केली आहे. इराकच्या कुर्दिस्तान क्षेत्रात इराणने एकाचवेळी ड्रोनद्वारे मोठा हल्ला चढवला. यात फ्रान्सच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. इराकच्या एरबिल भागात हवाई हल्ल्यात एका फ्रान्सच्या सैनिकाचा मृत्यू झाला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी ही माहिती दिली. अन्य सैनिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. फ्रान्सचे सैनिक दहशतवादाविरोधात लढण्याच्या प्रशिक्षणासाठी इराकमध्ये होते. इराकी सैन्यासोबत सराव करत असताना ही घटना घडली आहे.

हा हल्ला ड्रोनव्दारे करण्यात आला. एरबिलच्या गर्व्हनरनुसार, दोन ड्रोन्सनी सैन्य तळांना लक्ष्य केलं. Mala Qara बेसवर हा हल्ला झाला. हा भाग एरबिलपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात अन्य सैनिक जखमी झाले आहेत. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध मागच्या महिन्याच्या 28 तारखेला सुरु झालं होतं. इस्रायल-अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला होता.

हल्ल्यासाठी किती ड्रोन्स वापरले?

ड्रोन हल्ल्यात जखमी झालेले फ्रान्सचे सहा सैनिक दहशतवादविरोधी प्रशिक्षण युद्ध सरावात सहभागी झाले होते, असं फ्रान्सच्या सैन्याने गुरुवारी सांगितलं. सैनिकांना जवळच्या मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं, असं जनरल स्टाफच्या सदस्यांनी गुरुवारी AFP ला सांगितलं. एरबिलच्या गवर्नरने सांगितलं की, हल्ल्यात दोन ड्रोन्सचा वापर करण्यात आला. एरबिलपासून 40 किलोमीटर अंतरावरील माला काराच्या बेसवर हा हल्ला झाला.

इटलीच्या सैन्य बेसवर सुद्धा ड्रोन हल्ला

इराण-इस्रायल युद्धाला 15 दिवस झाले आहेत. जगातील अनेक देश या युद्धात ओढले गेले आहेत. जगावर याचे पडसाद उमटत आहेत. इराणने प्रत्युत्तर देताना एकाचवेळी अनेक देशांवर हल्ले केले. इराण समर्थित गटांवर अशा हल्ल्यांचा आरोप केला जात आहे. एरबिलमध्ये याआधी इटलीच्या सैन्य बेसवर सुद्धा ड्रोन हल्ला झाला होता. त्यात कोणी जखमी झालं नव्हतं. अशा हल्ल्यांनी इतर देशांची चिंता वाढवली आहे. फ्रान्स या हल्ल्याला कसं प्रत्युत्तर देणार ते पाहण्यासारखं असेल. एरबिलमध्ये हल्ला करण्यामागचं एक कारण अमेरिकाच आहे. एरबिलमध्ये अनेक देशांचे सैनिक तैनात आहेत. जे कुर्द सुरक्षा पथकांना प्रशिक्षण देत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in