• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran-Israel War : युद्धाच्या धामधुमीत अमेरिकेचा इराणला मोठा झटका, भारतात येणारं विमान टार्गेट

March 31, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करत युद्धाला तोंड फोडलं, महिन्याभरानंतरही हा संघर्ष कायम आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले चढवण्यात येत आहेत. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये एका इराणी विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. हे विमान भारतात मदत घेण्यासाठी येणार होतं. सोमवारी अमेरिकेने इराणच्या मशहद विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात महान एअरचे एक विमान क्षतीग्रस्त झालं असून, त्यामुळे भारताला जाणाऱ्या मानवतावादी मदत मोहिमेत संभाव्य अडथळा निर्माण झाला आहे, असं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. इ

राणी जनतेसाठी अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य आणि मदत पोहोचवण्यासाठी हे विमान या आठवड्यात नवी दिल्लीला जाणार होते, असं त्यांनी नमूद केलं. मात्र, अमेरिकी अधिकाऱ्यांनी हल्ल्याच्या या दाव्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.  हे विमान 1 एप्रिल म्हणजे उद्या पहाटे 4 वाजता दिल्ली येथे पोहोचणार होतं, मात्र मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं असतानाच त्या विमानावर हल्ला झाला, ज्यामुळे मदतकार्यात मोठा व्यत्यय आला आहे. हे विमान भारत आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या मानवतावादी मदतकार्याचा एक भाग होते.

महान एअरलाइन्सच्या विमानावर हल्ला

इराणच्या मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात महान एअरलाइन्सच्या (इराण एअरलाइन्सच्या) एका विमानाचे नुकसान झाले. मात्र, अमेरिकेकडून याला तात्काळ दुजोरा मिळाला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, दिल्लीने इराणला मदत पाठवली होती, जे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक आणि मानवतावादी संबंधांचे प्रतीक आहे.

आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन

या हल्ल्यानंतर इराणच्या नागरी विमान वाहतूक संघटनेने या घटनेचे निषेध करत हा युद्धगुन्हा आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे विमान अनेक देशांमधून आयात केलेली औषधे आणि वैद्यकीय उपकरणे घेऊन मानवतावादी मोहिमेवर होतं, असं भारतातील इराणी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटलं. मात्र अशा नागरी विमानाला लक्ष्य करणं हे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नियमांचे उल्लंघन असून मानवतावादी कायद्याच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे, अशी टीका त्यात करण्यात आली.

जागतिक कायदेशीर चौकटींचा हवाला देत, संघटनेने शिकागो करार (1944 ) आणि मॉन्ट्रियल करार (1971) यांचा उल्लेख केला, ज्यामुळे नागरी विमानांना धोका निर्माण करणारे हल्ले हे आंतरराष्ट्रीय गुन्हे ठरतात. तसेच, त्यांनी जिनिव्हा कराराच्या प्रोटोकॉल I च्या कलम 52 चाही हवाला दिला, मानवतावादी मदत वाहून नेणाऱ्या विमानांसह नागरी वस्तूंवरील हल्ले युद्ध गुन्हे ठरू शकतात असं त्यात म्हटलं आहे.

दोषींवर खटला चालवण्याची मागणी

या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर खटला चालवा आणि नागरी विमान वाहतुकीला भविष्यात असे धोके टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करा, असं आवाहन नागरी विमान वाहतूक संघटनेने आंतरराष्ट्रीय संस्थांना केलं आहे. इराणच्या सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या महान एअरलाइन्सवर गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेचे निर्बंध आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?
  • अक्षय तृतीयेला मीठ खरेदी करणे का शुभ आहे? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..
  • ‘मनबाधा’ चिरंतराची एक अथक जखम… प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी डिंगणकर यांच्या पुस्तकाचे मांडले विविध पैलू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in