• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran Israel War : युद्धाची व्याप्ती वाढल्याने भारतीयांची सुटका करणे आव्हानात्मक, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन

March 4, 2026 by admin Leave a Comment


इराण हे युद्ध स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लढत आहे.अमेरिकेने इराणवर अण्वस्रांसंदर्भात अटी टाकल्या होत्या. युरेनिमय संवर्धन न करणे आणि आंतरखंडीय क्षेपणास्रांची निर्मिती सोडून देणे अशा दोन अटी महत्वाच्या होत्या. या अटी इराणने मान्य केले नाही.आम्ही स्वसंरक्षणासाठी हे करतोय असे इराणचे म्हणणे होते. परंतू इराणने जर अण्वस्रे निर्माण केली तर अमेरिका अण्वस्राच्या टप्प्यात येईल आणि इस्राईलचे अस्तित्व धोक्यात आले होते.अमेरिकेला संसाधन कितीही नष्ट झाले तरी फरक पडत नाही. मात्र, त्यामुळे अमेरिका आणि इस्राईलने सगळ्या प्रणाली वापरुन इराणवर अटॅक केला असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी म्हटले आहे.

कोणत्याही देशाचे नेतृत्व संपवण्याचे परिणाम वाईट असतात. ज्या माणसाने गेली 35 वर्षे त्या ठिकाणी राज्य केले, तो गेल्यानंतर तिथे त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. पण त्याच्या विरोधात सुद्धा मोठी जनता होती आणि जो तिथला आधीचा राजा होता, त्याचा मुलगा अमेरिकेमध्ये राहतो. त्याच्या नेतृत्वाखाली नवीन पिढी रस्त्यावर उतरली होती त्यामुळे त्याने हे सरकार बदलण्यात आलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला होता असेही पटवर्धन यांनी सांगितले.

हे युद्ध चालू राहण्याची शक्यता जास्त आहे, जे कोणी नवीन नेतृत्व येतील त्याला मिलिटरीवर आपली छाप पाडायला वेळ लागणार आहे, आतापर्यंत अनेक तास निघून गेले आणि अजूनही मिसाईल टाकणे सुरू आहे, इराणने अमेरिकेला आधीच बजावले होते आणि जगाला बजावले होते की अमेरिकेला आमच्यावर हल्ला करण्यापासून रोखा, त्यानुसार त्यांनी आता खाडी बंद केली आहे, त्यामुळे त्यांनी तेथील खाडी बंद केल्या आहेत. त्यामुळे विमान मार्ग बंद करण्यात आले आहेत असे पटवर्धन यांनी सांगितले.

युरोपमध्ये जर हल्ला सुरू झाला तर…

या वातावरण सुरळीत व्हायला जवळपास सहा महिने लागणार आहेत. पहिल्या दिवशी ४८० फ्लाईट रद्द झाल्या, आज जवळपास अडीच हजार फ्लाईट कॅन्सल झाल्या आहेत.जगातील जवळपास सहा हजार फ्लाईटवर त्याचा परिणाम झाला आहे. हा एक महत्त्वाचा रूट होता तो बरबाद केल्यामुळे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होणार आहे. भारतावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होत आहे, कारण भारताची सुद्धा मोठ्या प्रमाणात विमान डायव्हर्ट झालेली आहे, तिथे युद्ध चालू असल्याने युरोपमध्ये जायचे म्हटले तर आता कसे जायचे हा प्रश्न आहे. याच्या नंतरची युरोपची पाळी आहे आणि युरोपमध्ये जर हल्ला सुरू झाला तर मग जर्मन, फ्रान्स यांच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. त्यांच्यावर जर हल्ला झाला काल रात्री त्या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींमध्ये बैठक झाली आहे, त्यातून काय निघाले हे अजून पुढे आलेले नाही यावर ते तोडगा नेहमी नक्की काढतील अशी आशा आहे असेही त्यांनी सांगितले.

बाय रोड त्या लोकांना युरोपमध्ये आणायचे, मग…

आधी ॲक्शन होत होती ती एका देशावर होत होती. मात्र आता ही ॲक्शन मोठी आहे, त्यामुळे आपले लोक तिकडे अडकले आहेत. त्यांच्यासाठी आपण त्यांना विमाने पाठवून आणू शकत होतो. मात्र आता विमान पाठवण्याचा मार्गही बंद आहे, जवळपास ८० हजार ते एक कोटीच्या जवळ लोक आपली अडकलेली आहेत. त्यांना आणायचे म्हटले तर तिथे आता फॅसिलिटी राहिलेली नाही, त्यामुळे त्यांची सुटका करण्यासाठी जरी इराण वरील कारवाई जरी थांबवली तरी आपण तिथे विमान लँड करू शकणार नाहीत. सुरक्षिततेच्या प्रश्न मोठा आहे. तिथून एकच उपाय करतो की बाय रोड त्या लोकांना युरोपमध्ये आणायचे. मग आफ्रिकेला वळसा घालून समुद्रमार्गे आणण्याचा मार्ग आहे किंवा मग त्या लोकांना तिथेच राहून त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल असेही रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in