• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran, Israel War : चीन आपला मित्र इरणसाठी मैदानात, शेवटी संयम सुटला, जिनपिंग यांची अत्यंत मोठी घोषणा

March 6, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, गेल्या सात दिवसांपासून अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे इस्त्रालय आणि अमेरिकेचं देखील मोठं नुकसान झालं आहे. गेल्या आठवड्यात इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. दरम्यान त्यापूर्वीच अमेरिकेनं युद्धाची सर्व तयारी केली होती. मध्य पूर्वेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दोन सर्वात शक्तीशाली नौका तैनात केल्या होत्या तसेच नौदलाची संख्या देखील वाढवली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अमेरिकेकडून भारतामधून इराणला परतत असलेल्या इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडीने हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये ही युद्धनौका बुडाली असून, यामधील 87 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर काही जणांना वाचवण्यात यश आलं आहे. श्रीलंकेच्या नौदलानं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करून या यु्द्ध नौकेवरील लोकांचे प्राण वाचवले.

दरम्यान त्यानंतर 24 तासांमध्येच इराणने या हल्ल्याचा बदला घेतला, इराणकडून अमेरिकेचं एक तेलवाहतूक करणारं जहाज लक्ष्य करण्यात आलं. या जहाजावर इराणने मिसाईल हल्ला केला. हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार युद्धाला चिथावणी देणारे स्टेटमेंट्स समोर येत आहेत. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं संपूर्ण जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये आता चीनने पुढाकार घेतला आहे.

मध्य पूर्वेत निर्माण झालेला तणाव पहाता आता चीनने मोठा निर्णय घेतला आहे. सात दिवस होऊन सुद्धा हे युद्ध सुरूच असल्यामुळे अखेर आता चीनचा देखील संयम सुटला आहे.चीन आपला मित्र इराणच्या मदतीला धावून आला आहे. चीन मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपला स्पेशल दूत पाठवणार आहे. याबाबत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बुधवारी माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार चीनचं असं म्हणणं आहे की, मध्य पूर्वेत तणाव वाढतच चालला आहे. या संदर्भात चीनकडून सौदी अरेबीयाच्या सरकारशी देखील बोलणं झालं आहे. चीनने आता मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी आपला स्पेशल दूत पाठवण्याची तयारी केली आहे. दरम्यान आता हे युद्ध थांबवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे, त्यामुळे चीन हे युद्ध थांबवणार का हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in