• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran Israel War : इराणचं नशीब फळफळलं, अमेरिकेचा कट्टर शत्रू आता थेट मैदानात, ट्रम्प, नेतान्याहू यांना 440 होल्टचा झटका

March 5, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेला इतर देशांकडून मिळणारा पाठिंबा वाढत आहे. अमेरिकेला आतापर्यंत जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, सौदी, कतार या सारख्या देशांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे मात्र इराण या युद्धात एकटं पडल्याचं चित्र आहे. मात्र तरी देखील इराणने हार मानलेली नाहीये. इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले केले आहेत.  तसेच अमेरिकेचे सैन्य तळ ज्या -ज्या देशांमध्ये आहेत, अशा सर्व मुस्लिम देशांवर देखील इराणकडून हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचं आणि इस्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे. आज युद्धाच पाचवा दिवस आहे. या युद्धामुळे इराण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान एकीकडे पाकिस्तान, चीन आणि रशिया सारखे देश इराणचे चांगले मित्र असल्याचं दाखवत आहेत. मात्र अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केल्यानंतर यापैकी एकही देश इराणच्या मदतीला आला नाही. चीन आणि रशियाकडून फक्त या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. मात्र या विरोधात कोणतीही थेट कारवाई केली नाही. त्याचं कारणं देखील वेगवेगळी आहेत.

रशिया हा गेल्या अनेक वर्षांपासून युक्रेनसोबतच्या युद्धात अडकला आहे. या युद्धामध्ये रशियाचा पैसा प्रचंड प्रमाणात खर्च झाला आहे, सैन्यबळ देखील मोठ्या प्रमाणात तिकडे अडकलं आहे. तर दुसरीकडे चीनला तैवान ताब्यात घ्यायचं आहे, त्यामुळे हे दोन्ही देश अजून तरी प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात उतरलेले नाहीत, मात्र इराणसाठी आता गुड न्यूज समोर आली आहे.

ती म्हणजे उत्तर कोरियानं आता थेट इराणला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात किम जोंग उन यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलचं टेन्शन वाढलं आहे. किम जोंग उन यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच जर इराणला गरज असेल तर आम्ही आमचे मिसाईल पाठवू असं त्यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…
  • Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
  • Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
  • IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in