• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran वर हल्ल्यासाठी भारतीय तळाचा वापर? LEMOA कराराची अट काय? मोठी अपडेट काय?

March 6, 2026 by admin Leave a Comment


Iran Israel America War: सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी हे 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले. त्यानंतर युद्ध लवकरच संपुष्टात येणार असा दावा करण्यात येत होता. पण इराणचे निमलष्करी दल, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC) अजूनही शस्त्र खाली ठेवायला तयार नाही. या युद्धाची झळ आता सर्वच जगाला बसायला लागली आहे. खास करून पेट्रोल-डिझेल आणि नैसर्गिक वायूची आयात करणाऱ्या देशांना या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. त्यात भारत आघाडीवर आहे. हे संकट कमी होते की काय आता LEMOA कराराची चर्चा होत आहे. या युद्धात खरंच भारत ओढल्या जाईल का? काय आहे तो करार?

भारताच्या तळाचा वापर होणार?

श्रीलंकेच्या दक्षिणी समुद्र किनाऱ्यावर हिंद महासागरात अमेरिकेने इराणची युद्ध नौका IRIS Dena बुडवली. आण्विक पाणबुडीचा वापर करत युद्धनौका बुडवण्यात आली. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील दशकापूर्वीच्या लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट (LEMOA) ची चर्चा होत आहे. IRIS Dena बुडवल्यानंतर मोठा दावा करण्यात येत आहे. त्यानुसार आता इराकवर हल्ला करण्यासाठी, त्यांच्या पाणबुड्यांवर हल्ला करण्यासाठी अमेरिका भारतीय लष्करी तळांचा वापर करणार आहे. LEMOA करार हा 2016 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानुसार दोन्ही देश काही सैन्य व्यवस्थांचा वापर करू शकतात. त्यामुळे इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिका भारतीय तळाचा वापर करणार का याची चर्चा जोर धरू लागली आहे.

भारताचा स्पष्ट नकार

अमेरिकेच्या एका माजी सैन्य अधिकाऱ्याने LEMOA कराराचा उल्लेख न करता दावा केला होता की भारताच्या नौदल तळाचा अमेरिका या युद्धासाठी वापर करू शकते. पण भारत सरकारने हा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे. हा करार भारताला कोणत्याही युद्ध संघर्षात ओढू शकत नाही असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे याविषयीचे सर्व आरोप आणि दावे खोटे असल्याचे समोर आले आहे.

भारत आणि अमेरिकेतील LEMOA करार आहे काय?

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात 29 ऑगस्ट 2016 रोजी लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट (LEMOA) वर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा एक लष्करी करार आहे. त्यातंर्गत दोन्ही देश एकमेकांना इंधन भरणे, पुरवठा आणि इतर दुरुस्तीसाठी एकमेकांना लष्करी सहकार्य करतील. सोयी-सुविधा वापरू शकतील.

LEMOA करारातंर्गत अमेरिकन लष्कराची भारतीय नौदल, लष्करी तळावर नियुक्ती असा होतो का, तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. या करारात असा कोणताही मुद्दा, कलम वा तरतूद नाही. भारतीय जमिनीवर अमेरिकेचे लष्कर वा त्यासाठी कोणतेही तळ उभारल्या जाऊ शकत नाही. हा एक लॉजिस्टिक सुविधेचा करार आहे. दोन्ही देश केवळ त्यांच्या तळाचा सोयी-सुविधांसाठी वापर करू शकतात. संघर्ष निर्माण करण्यासाठी, हल्ल्यासाठी त्याचा वापर करू शकत नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in