
आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ भिडले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या. तसेच विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. (Photo: IPL/BCCI)
पंजाब किंग्सकडून विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या मैदानात उतरले होते. या दोघांनी आक्रमक सुरूवात केली. पावरप्लेमध्ये 93 धावा केल्या. तसेच 38 चेंडूत 99 धावांची खेळी केली. यात प्रियांश आर्याने 20 चेंडूत 57 धावा केल्या.(Photo: IPL/BCCI)
प्रियांश आर्याने 16 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 312.50 चा होता. पंजाब किंग्ससाठी केएल राहुलनंतर दुसरं वेगवान अर्धशतक प्रियांश आर्याने ठोकलं. (Photo: IPL/BCCI)
पंजाब किंग्ससाठी 2018 मध्ये केएल राहुलने 14 चेंडूत अर्धशतक, प्रियांश आर्याने 2026 मध्ये 16 चेंडूत अर्धशतक, 2020 मध्ये निकोलस पूरनने 17 चेंडूत आणइ 2024 मध्ये प्रभसिमरन सिंगने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. (Photo: IPL/BCCI)
प्रियांश आर्याने दुसर्या षटकात जयदेव उनाकडचा सामना करताना 4 चेंडूत 11 धावा, तिसऱ्या षटकात इशान मलिंगाचा सामना करताना 4 चेंडूत 7 धावा, चौथ्या षटकात जयदेव उनाडकला 1 चेंडूत 1 धाव, पाचव्या षटकात इशान मलिंगाला 3 चेंडूत 11 धावा, सहाव्या षटकात हर्षल पटेलला 6 चेंडूत 21 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI)




Leave a Reply