• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद

April 11, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेच्या 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा आमनासामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या. तसेच विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हा न पंजाब किंग्सने 6 गडी राखून पूर्ण केलं. यासह पंजाब किंग्सने स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आहे.  या विजयासह पंजाब किंग्सच्या खात्यात 7 गुण पडले असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे.

पंजाब किंग्सचा डाव

विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकात 99 धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्याने 20 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 57 धावा केल्या. तर प्रभसिमरन सिंगने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 51 धावा केल्या. तर कूपर कोनोली फक्त 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पंजाबचा विजयाचा मार्ग सोपा होत गेला.  श्रेयस अय्यरने 24 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि संघाला संकटातून बाहेर काढण्यात मोलाचा हातभार लावला.

सनरायझर्स हैदराबादचा डाव

अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिड हेड ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने हैदराबादला आक्रमक सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 74 आणि ट्रेव्हिस हेडने 23 चेंडूत 38 धावांची खेळी केली. ही जोडी फुटली आणि धावगतीला ब्रेक बसला. इशान किशन 17 चेंडूत 27 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 39 धावा करताना 33 चेंडूंचा सामना केला. त्यामुळे धावगती वाढवण्यात फार काही मदत झाली नाही. अनिकेत वर्माने 18, सलील अरोराने 9 धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने नाबाद 0 आणि हरिश दुबेने नाबाद 1 धाव केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in