• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स! 31 सामन्यात असा आहे रेकॉर्ड

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील तिसऱ्या टप्प्याचे सामने सुरू आहेत. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं आहे. तर मुंबई इंडियन्सनने कोलकात्याला पराभूत केलं, तर दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्स होमग्राउंड असलेल्या गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यात कोणाचं पारडं जड हे सांगणं कठीण आहे. कारण दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होण्याची शक्यता आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही 31 वेळा आमनेसामने आले आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाचं पारडं जड आहे ते…

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून खेळत आहेत. या दोन्ही संघांचा 31 वेळा आमनासामना झाला आहे. यात दोन्ही संघात तूल्यबळ सामना झाला आहे. मुंबई इंडियन्सने 16, तर राजस्थान रॉयल्सने 14 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित ठरला आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी एकमेकांना तोडीस तोड उत्तर दिलं आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वोच्च 217 धावसंख्या केली आहे. तर सर्वात कमी धावसंख्या ही 92 आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक 212 आणि सर्वात कमी 90 धावा केल्या आहेत.

नाणेफेकीचा कौल आणि निकाल

नाणेफेकीच्या कौल पाहिला तर 30 पैकी 16 सामन्यात मुंबई इंडियन्सने आणि 14 सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने 8 वेळा फलंदाजी आणि 6 वेळा फिल्डिंग निवडली आहे. यात नाणेफेक जिंकल्यानंतर 8 वेळा विजय मिळवला आहे. तीन वेळा फलंदाजी आणि 5 वेळा गोलंदाजी निवडल्यानंतर विजय शक्य झाला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने 16 वेळा नाणेफेक जिंकली आहे. यात 11 वेळा गोलंदाजी आणि 5 वेळा फलंदाजी निवडली आहे. नाणेफेक जिंकून 8 वेळा विजय मिळवला आहे. यात प्रथम फलंदाजी घेतली तेव्हा 2 वेळा आणि गोलंदाजी घेतली तेव्हा 6 वेळा विजय मिळवला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Innova आणि Fortuner च्या किमतीत मोठी वाढ, नवीन दर जाणून घ्या
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं
  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in