• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 16 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?

March 12, 2026 by admin Leave a Comment


आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 2025 मध्ये 17 वर्षांची प्रतिक्षा संपली. रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात 18 व्या मोसमातील (IPL 2025) अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या पंजाब किंग्सला पराभूत केलं. रजतने यासह आरसीबाला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन करुन दिलं. आता आरसीबी 19 व्या मोसमात (IPL 2026) गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. आयपीएलकडून या 19 व्या मोसमाचं 11 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक संघांना या पहिल्या टप्प्यात किमान 3 सामने खेळायला मिळणार आहेत. या निमित्ताने आपण आरसीबीचं पहिल्या टप्प्यात कधी आणि कुणाविरुद्ध सामने होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

आरसीबीचे पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने

आरसीबी पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे.आरसीबीचे या 4 पैकी 2 सामने घरच्या मैदानात होणार आहेत. तर आरसीबीला उर्वरित 2 सामने हे प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळावे लागणार आहेत. आरसीबी मोहिमेतील पहिलाच सामना 28 मार्च रोजी शनिवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे.

आरसीबीचं पहिल्या टप्प्यातील 4 सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, 28 मार्च, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, बंगळुरु

दुसरा सामना, 5 एप्रिल, विरुद्ध सीएसके, बंगळुरु

तिसरा सामना, 10 एप्रिल, विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुवाहाटी

चौथा सामना, 12 एप्रिल, विरुद्ध मुंबई इंडियन्सय, मुंबई

रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हीड, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिलीप सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथेल, कृणाल पंड्या, रोमारीयो शेफर्ड, जोश हेझलवुड, रसिक सलाम दार, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, स्वप्नील सिंग, यश दयाल, नुवान तुषारा, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, विकी ओस्तवाल आणि सात्विक देसवाल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in