• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 RCB : टी 20i वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणाऱ्या गोलंदाजाला हेझलवूडच्या जागी संधी?

March 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 11 दिवस बाकी आहेत. या बहुप्रतिक्षित 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच दुखापतीची कटकट सुरु झाली आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद या 2 संघांची डोकेदुखी वाढली आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या दोघांचा दुखापतीसोबत गेली अनेक महिने संघर्ष सुरु आहे. पॅट आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्व करतो. तर जोश आरसीबाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून या दोघांना दुखापतीमुळे आयपीएलसाठी एनओसी देण्यात आलेली नाही. हेझलवूड आण पॅट दोघांना दुखापतीमुळे मोसमातील पहिल्या काही सामन्यांना मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जोश हेझलवूड पहिल्या 2 सामन्यांमधून आऊट!

जोश हेझलवूड आरसीबाचा प्रमुख आणि मॅचविनर बॉलर आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोशला दुखापतीमुळे या 19 व्या मोसमातील पहिल्या 2 सामन्यांना मुकावं लागणार आहे. त्यामुळे जोशला सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळता येणार नाही. त्यामुळे जोशच्या जागी पहिल्या 2 सामन्यांसाठी नुकत्याच झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळलेल्या गोलंदाजाला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेझलवूड याने आरसीबीला गेल्या मोसमात चॅम्पियन करण्यात बॉलिंगने योगदान दिलं. जोशने गेल्या मोसमात एकूम 22 विकेट्स मिळवल्या. मात्र जोश 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यासाठी उपलब्ध नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याला संधी मिळू शकते.

जेकब डफी हेझलवूडची जागा घेणार?

जेकब डफी नुकत्याच झालेल्या टी 20I वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. जेकब न्यूझीलंडचा टी 20I क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज आहे. जेकबने टी 20I कारकीर्दीत 48 सामन्यांमध्ये 62 विकेट्स मिळवल्या आहेत.

डेथ ओव्हर स्पेशालिस्ट

आता जेकब डफी जोश हेझलवूड याची जागा घेण्याइतपत सक्षम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निमित्ताने जेकबबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

जेकब डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट आहे. तसेच जेकब पावरप्लेमध्ये चिवट बॉलिंग करण्यात पटाईत आहे. जेकबकडे योग्य वेगात बॉल आणि बाउन्सर टाकण्याची क्षमता आहे. त्यामुळे जेकबला संधी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इस्लामाबादच्या बैठकीआधीच भारताचा मोठा गेम, रातोरात भारताची अमेरिकेसोबत… काय घडलं दोन देशात?
  • Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?
  • ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट
  • तुम्ही दररोज नकळत खाताय प्लास्टिक? आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर!
  • संधी मिळताच पाकिस्तानने दाखवले दात… नोबेल पुरस्काराच्या मागणीच्या यादीतून ट्रम्प गायब; कोणत्या तीन लोकांसाही हवाय पुरस्कार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in