• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Points Table : आरसीबीचा विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, पलटणचा कितव्या क्रमांकावर?

April 6, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) चेन्नई सुपर किंग्सवर सहज आणि मोठा विजय मिळवला. आरसीबीचा रजत पाटीदार याच्या नेतृत्वाताली हा सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला. विशेष म्हणजे आरसीबीने घरच्याच मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्येच दोन्ही सामने जिंकले. आरसीबीला या विजयासह दुहेरी फायदा झाला आहे. आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. तर चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. यलो आर्मीच्या अडचणीत या पराभवामुळे आणखी वाढ झाली आहे. तसेच पॉइंट्स टेबलमध्ये इतर संघ कोणत्या स्थानी आहेत? हे जाणून घेऊयात.

आरसीबीचा 19 व्या मोसमातील हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. आरसीबी सलग 2 सामने जिंकणारी 19 व्या मोसमातील चौथी टीम ठरली. आरसीबीआधी पंजाब, दिल्ली आणि राजस्थानने सलग 2 सामने जिंकले आहेत. तसेच आरसीबीला सलग दुसऱ्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांचा फायदा झाला आहे. आरसीबीने पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि राजस्थान रॉयल्सला मागे टाकलं. बंगळुरुने राजस्थानला मागे टाकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मात्र आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये घट झाली आहे.

आरसीबीचा चेन्नई विरूद्धच्या सामन्याआधी नेट रनरेट हा +2.907 असा होता. मात्र चेन्नई विरूद्धच्या विजयानंतर आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये घट झाली. ताज्या आकडेवारीनुसार आरसीबी टीमचा नेट रनरेट हा +2.501 असा झाला आहे.

टॉप 5 मध्ये कोण?

राजस्थान, दिल्ली आणि पंजाबनेही आरसीबीप्रमाणे प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. मात्र या 3 संघांच्या तुलनेत आरसीबीचा नेट रनरेट चांगला असल्याने ते पहिल्या स्थानी आहेत. तर राजस्थान दुसऱ्या, दिल्ली तिसऱ्या आणि दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहेत. हैदराबाद पाचव्या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 3 पैकी 1 तर मुंबईने 2 मधून 1 सामना जिंकला आहे.

चेन्नई शेवटून पहिल्या स्थानी

चेन्नईचा आरसीबी विरुद्धचा हा 19 व्या मोसमातील एकूण आणि सलग तिसरा पराभव ठरला. चेन्नईची यासह पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नई व्यतिरिक्त गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला अजूनही विजयाचं खातं उघडण्यात यश आलेलं नाही. गुजरात आठव्या तर कोलकाता नवव्या क्रमांकावर आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी
  • हंसिका मोटवानीने वहिनीलाच म्हटलं ‘सी-ग्रेड अभिनेत्री’; मानहानीचा खटला दाखल, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in